सध्या सोशल मीडियावर रील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. सेलिब्रिटी कपलही सोशल मीडियावरून ट्रेंडिंग रील शेअर करताना दिसतात. यांत एका रील व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घेतला आहे. हा रील व्हिडीओ शेअर करणारे कपल म्हणजे अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर. आजवर ऐश्वर्या नारकर व अविनाश यांनी शेअर केलेले प्रत्येक रील व्हिडीओ नेहमीच चर्चेत राहिले. ट्रेंडिंग रीलवर नारकर कपलने धरलेला ठेका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. (Aishwarya Narkar And Avinash Narkar)
विविध ट्रेंन्डिंग गाण्यावर व्हिडीओ, रील बनवताना नारकर कपल दिसतात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून बरीच पसंती मिळत असते. पण बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. बऱ्याचदा ऐश्वर्या त्यांना सडेतोड उत्तरही देताना दिसतात. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते. सोशलमिडीयावरून काही ना काही पोस्ट करून ऐश्वर्या व अविनाश चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
आजवर ऐश्वर्या यांनी त्यांच्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. फिटनेसच्या बाबतीत ही ऐश्वर्या नेहमीच ऍक्टिव्ह असतात. अशातच ऐश्वर्या यांनी पतीबरोबरचा एक रील व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे नारकर कपल एका भोजपुरी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. यांत दोघांनीही गांधीटोपी व चष्मा लावून हा रील व्हिडीओ शूट केला आहे.
नारकर कपलच्या या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर एका नेटकाऱ्याने केलेल्या गमतीशीर कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका नेटकऱ्याने गमतीत, “ताई टोपी उलटी घातली आहे तुम्ही, शिलाईची बाजू मागे असते. बाकी डान्स नाद खुळा. जोडी नं १” अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर प्रतिक्रिया देत ऐश्वर्या नारकर यांनी, कपाळाला हात लावल्याचा ईमोजी व हसण्याचा ईमोजी शेअर केला आहे.