मराठी सिनेविश्वातील सिद्धार्थ मिताली, रितेश जेनेलिया, उमेश प्रिया या जोड्या नेहमीच काही ना काही कारणास्तव चर्चेत असतात. रील लाईफ प्रमाणे रिअल लाईफमध्येही या जोड्या कसे असतात याचे अनेक व्हिडीओ कलाकार मंडळी शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांच्या रुटीनचे, एकमेकांसोबत वेळ घालवतानाचे अनेक व्हिडीओ फोटो ते नेहमीच शेअर करत असतात. (Umesh Kamat Angry)
पहा का रागवलाय उमेश कामत (Umesh Kamat Angry)
चाहतेही या कलाकारांच्या व्हिडीओ फोटोजला नेहमीच पसंती दर्शवत असतात. सिनेमाविश्वातली प्रिया बापट आणि उमेश कामत ही यांचीही जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडते. हे कपल नेहमीच मज्जा मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असतात.
अशातच उमेशने शेअर केलेल्या एका गमतीशीर व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांत उमेश प्रियासाठी कॉफी बनवताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये उमेश प्रियासाठी कॉफी बनवतो आणि प्रियाला आवाज देतो की प्रिया कॉफी तयार आहे, प्रिया कॉफी, मात्र प्रिया काही उमेशला उत्तर देत नाही तेव्हा चिडून उमेश ओरडतो कपेचीनो फॉर प्रिया तेव्हा प्रिया चा आवाज येतो आले. यावर उमेशने लिहिलंय, सारखं कॅफे मध्ये जाण्याची सवय असलेल्या बायकोला घरी कॉफी देणाऱ्या नवऱ्याची कथा. या व्हिडिओला उमेशने कॅप्शन देत लिहिलंय, घराचा कॅफे केलाय बाईंनी. माझ्या बायकोला आवडते माझ्या हातची कॉफी हीच मला मिळालेली खरी ट्रॉफी.(Umesh Kamat Angry)
हे देखील वाचा – दीपाचा बोल्ड अंदाज,मात्र फोटोवर कार्तिकीच्या नावाची रंगली चर्चा
प्रिया उमेशच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनीही कमेंट केलीय. २०११ साली प्रियाआणि उमेशने लगीनगाठ बांधली. एक दशकाहून अधिक काळ एकत्र असणारी ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर असते. या जोडीच्या सोशल मीडिया पोस्टही नेहमीच कपल्स गोल देणाऱ्या असतात. ‘आणि काय हवं’ या वेबसिरीज मधून प्रिया उमेशला एकत्र पाहणे रंजक ठरलं. त्यांची ही वेबसिरीज प्रचंड गाजली. शिवाय प्रिया आणि उमेश टाईम प्लिज या चित्रपटातही एकत्र दिसले होते.