आठवणी हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा असतो. जुन्या नव्या माणसांच्या सोबतच्या आठवणी प्रत्येकाला भावनिक करणाऱ्या असतात. अशीच एक जुन्या आठवणींची नवीन भेट पाहून प्रेक्षक सुखावले आहेत. ही भेट झालीय हृदयी वसंत फुलवणाऱ्या दोन मित्रांची म्हणजेच अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री अश्विनी भावे.(Ashvini Bhave Ashok Saraf)
सध्या रंगभूमीवर अशोक मामांच vaccum cleaner हे नाटक जोरदार सुरु आहे. या नाटकाच्या प्रयोगाला अभिनेत्री अश्विनी भावे यांनी उपस्थिती लावली होती. नाटक पाहिल्या नंतर नाटकाचं कौतुक करत अशोक सराफ, निर्मिती सावंत यांच्या सोबत अश्विनी यांनी काही फोटोज् पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री निवेदिता यांनी या फोटो वर ‘ आज ही त्याने निंबू कलरचा शर्ट घातला आहे ‘ अशी मिश्किल कमेंट करत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर बनवा बनवीचा तो क्षण उभा केला आहे.
पोस्टच्या कॅपशन मध्ये अश्विनी यांनी ‘ पुन्हा एकदा विनोदाच्या राणीचं काम बघताना मज्जा आली ‘ अस म्हणत अभिनेत्री निर्मिती सावंत यांच कौतुक केलं आहे. तर अशोक सराफ यांच्या बद्दल लिहिताना त्यांनी लिहिलंय ‘ अशोक कमाल! आजही तुझी एनर्जी प्रेक्षणीय आहे. अस म्हणत अशोक सराफ यांच्या कामाचं ही कौतुक अश्विनी यांनी केलं आहे.(Ashvini Bhave Ashok Saraf)