छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झालीय. एवढंच नाही तर या मालिकेतील दीपावर तर चाहते भरभरून प्रेम करतात. ही भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारते.अभिनेत्री रेश्मा शिंदेने अल्पावधीतच कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली.रेश्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.तिचा मोठा चाहता वर्गही आहे. या दीपाने शेअर केलेल्या फोटोवर कार्तिकीच्या नावाची चर्चा रंगली.(Reshma Shinde)
मालिकेत दीपा ही साधी-भोळी पाहायला मिळते.पण दीपा तिच्या खऱ्या आयुष्यात बोल्ड आहे.रेश्माने असाच एक सोशल मीडियावर फोटो शेअर केला त्यामुळे ती चर्चेत आलीय. यात तिने व्हाईट क्रॉप शर्ट आणि त्यावर पोलका डॉट्स स्कर्ट परिधान केलाय.कब प्यार की पहली नजर,ले गयी ले गयी,दिल ले गयी ले गयी असं कॅप्शन आणि हेच गाणं देखील तिने या फोटोला दिलंय.पण तिचा हा लूक पाहून चाहत्यांना कार्तिकीची आठवण आली. तिचा हा बोल्ड लूक चाहत्यांना आवडला असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय. अश्यातच एका चाहत्याने तू कार्तिकीसारखी वाटतेस अशी कमेंट केली आहे. मात्र मालिकेत कार्तिकी ही दीपाचा तिरस्कार करताना दिसते. मालिकेत कार्तिकी मोठी झाली असून अनुष्का पिंपुटकर ही कार्तिकीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा: ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं ऐकून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं बारामती तालुक्याचं खरं नाव….
मालिकेत सुरु असणाऱ्या रंजक वळणामुळे दीपा- कार्तिकी यांच्यात दुरावा निर्माण झाला.पण या दोघींमध्ये ऑफस्क्रीन धम्माल केमिस्ट्री पाहायला मिळतेय. मालिकेत मायलेकींची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे बऱ्याचदा त्या सेटवर मज्जामस्ती करत असतात. या सेटवरचे फोटो, व्हिडीओदेखील त्या शेअर करत असतात.असेच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.यात त्यांच्यातील जमलेली गट्टी दिसते.(Reshma Shinde)
सध्या मालिकेत देखील दीपा-कार्तिकीमधील दुरावा संपताना पाहायला मिळतोय. मलिकेतील आजच्या भागात देखील कार्तिकी ही दीपासाठी पोहे बनवते.तर आता त्यांच्यातील दुरावा संपून कार्तिकी देखील आईची साथ देणार का?हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे.
