लहान पडद्यावरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचे पुढील पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुन्या पर्वामध्ये अनेक गोष्टींवर वाद-विवाद झालेले दिसून आले आहेत. त्यामधील अधिक चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर. या कार्यक्रमामध्ये ‘गुत्थी’ हे पात्र सुनीलने साकारले होते. या पात्राला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. पण कपिल व सुनीलमध्ये झालेल्या वादामुळे सुनील या कार्यक्रमातून बाहेर पडला. पण आता या कार्यक्रमाचे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये सुनील ग्रोव्हर एका नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. (sunil grover on kapil sharma)
सुनीलला पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये पाहून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. गेल्या खूप काळापासून सुनील या कार्यक्रमापासून लांब असल्याने यामध्ये परत त्याने यावे अशी सगळ्यांची इच्छा होती. २०१७ साली कपिल व सुनील यांच्यामध्ये वादावादी झाली होती. एका विमानात असताना दोघांमध्ये मोठी भांडणं झाली त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते. पण त्याच्या जाण्यानेकार्यक्रमामध्ये एक पोकळी निर्माण झालेली दिसून आली. पण आता नवीन पर्वाच्या निमित्ताने दोघेही कलाकार पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. दरम्यान या शोच्या निमित्ताने झालेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की दोघांची भांडणे हा एक ‘पब्लिसिटी स्टंट’ होता.
तसेच सुनील यावेळी म्हणाला की, “मला या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा भाग बनून खूप आनंद होत आहे. ही एक अशी जागा आहे जिथे काम हे कामसारखे वाटत नाही. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आमहि पूर्ण वेळ आनंदात घालवतो. आम्हाला नवीन गोष्टी करायला आवडतात. जेव्हा आम्ही नवीन भागाची तालिम करत असतो तेव्हा मी अधिक खुश असतो. आम्ही पूर्ण दिवस मस्करी करतो आणि मस्ती करत असतो.”
कपिल व सुनीलच्या भांडणाबद्दल सुनीलने सांगितले की, “ते आम्ही दोघांनी केलेलं नाटक होतं. तेव्हापासून आम्ही नवीन शोचे प्रमोशन करत होतो. तेव्हा नेटफ्लिक्स नव्याने भारतात येत होते त्यामुळे तेव्हा हे सर्व विमानात करणे आम्हाला फायद्याचे वाटले”. पुढे तो म्हणाला की, “तेव्हा नेटफ्लिक्स सुरु झालं होतं त्यामुळे आम्हाला वाटले की प्रेक्षकांना धरुन ठेवण्यासाठी काहीना काही करावे लागेल.त्यामुळे पब्लिसिटी स्टंटसाठी भांडणं केली”. त्यानंतर तो म्हणाला की, “हा कार्यक्रम जगभरात आल्याने आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो. हे सर्व नेटफ्लिक्समुळे होत आहे. प्रेक्षकांनी आम्हाला खूप प्रेम दिले आहे. आम्ही खूप वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आलो आहोत. पुढेही आम्हाला असेच प्रेक्षकांचे प्रेम मिळेल ही अपेक्षा आहे”.
आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर व सुनील ग्रोव्हर दिसत आहेत. हा कार्यक्रम ३० मार्चपासून नेटफ्लिक्सवर रात्री ८ वाजता प्रदर्शित केला जाईल.