शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याशी गुपचूप उरकलं लग्न, दोघांचंही झालं होतं पहिलं लग्न, घटस्फोट झाला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 27, 2024 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Aditi Rao Hydari got married for the second time with actor Siddharth in Telangana

अदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याशी गुपचूप उरकलं लग्न, दोघांचंही झालं होतं पहिलं लग्न, घटस्फोट झाला अन्...

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतंच गुपचुप लग्न करत सर्वांना धक्का दिला होता. अशातच आता तिच्या पाठोपाठ अभिनेत्री अदिती राव हैदरीने दुसरं लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. आदितीने दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थबरोबर विवाह केला असल्याचे म्हटलं जात आहे. आदिती व सिद्धार्थ यांनी आज (२७ मार्च) रोजी तेलंगणामधील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं असल्याचं वृत्त ‘ग्रेट आंध्र’ने दिलं आहे.

अर्थात याबद्दल अदिती किंवा सिद्धार्थ यापैकी कुणीही अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो अथवा व्हिडीओ समोर आलेले नाहीत. पण त्यांनी खासगी समारंभात साधेपणाने लग्न केल्याच्या चर्चा होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

आणखी वाचा – “काही दिवस १२-१३ तास सतत रडतेय आणि…”, आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “दुखवट्याचे सीन्स…”

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महा समुद्रम’ या चित्रपटामध्ये आदिती व सिद्धार्थने एकत्र काम केले होते. आदिती व सिद्धार्थ अनेक चित्रपट कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. एवढेच नाही तर दोघेही अनेकदा सुट्टीनिमित्त एकत्र फिरताना दिसले आहेत. त्याचबरोबर दोघेही अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावरील रिल्समध्येही एकत्र दिसले आहेत. अशातच आता या जोडप्याने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. 

आणखी वाचा – कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये भापती सिंह दिसणार?, सतत होणाऱ्या चर्चांवर स्वतःच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “समोरुन फोन…”

अर्थात यावर अदिती किंवा सिद्धार्थ यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतरच त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, अदितीचे पहिले लग्न २००९ मध्ये सत्यदीप मिश्राबरोबर झाले होते आणि त्यानंतर २०१३ मध्ये दोघे वेगळे झाले. सिद्धार्थचेही हे दुसरे लग्न असेल. सिद्धार्थचे पहिले लग्न २००३ मध्ये झाले आणि २००७ मध्ये त्याचा घटस्फोट झाला आहे.

Tags: aditi rao hydaribollywood actressBollywood entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Onkar Govardhan On Madhurani Prabhulkar

"तब्येतीवर परिणाम झाला आणि…", आशुतोषच्या मृत्यूमुळे मधुराणी दुःखात, अभिनेत्रीच्या पोस्टला ओंकारचं उत्तर, म्हणाला, "तुझी आठवण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.