रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मी नारायणन शेषु यांचे निधन, ६०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमवावा लागला जीव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 27, 2024 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Lakshmi Narayanan Seshu Death

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मी नारायणन शेषु यांचे निधन, ६०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमवावा लागला जीव

प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेता लक्ष्मी नारायणन शेषू यांचे वयाच्या ६०व्या वर्षी निधन झाले आहे. दिनांक २६ मार्च मंगळवार रोजी त्यांनी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शेषू यांना १५ मार्च रोजी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Lakshmi Narayanan Seshu Death)

लक्ष्मी नारायणन शेषू यांना त्यांचे चाहते प्रेमाने लोलू सभा शेषू या नावाने हाक देत. ‘लोलू सभा’ ​​या टीव्ही शोमधून त्याला हे नाव मिळाले. शेषूने धनुषबरोबर २००२मध्ये ‘थुलुवधो इलामाई’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. गेल्या २२ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी २१ चित्रपटांमध्ये काम केले होते. यामध्ये २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट तमिळ रोमँटिक व कॉमेडी चित्रपट ‘किक’ देखील समाविष्ट आहे. या चित्रपटात संथानम मुख्य भूमिकेत होता.

आणखी वाचा – “काही दिवस १२-१३ तास सतत रडतेय आणि…”, आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “दुखवट्याचे सीन्स…”

शेषू यांना हार्ट अटॅक येण्याआधी आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी मार्चमध्ये टीव्ही शो ‘लोलू सभा’च्या रियुनियन पार्टीमध्ये दिसले होते. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताला त्याचा मित्र रॅडिन किंग्सले यांनी दुजोरा दिला आहे. रॅडिन किंग्सले यांनी अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुमच्या आत्म्यास शांती लाभो”.

आणखी वाचा – केतकी माटेगावकर नेमकं कोणाला डेट करते?, अभिनेत्रीच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, म्हणाली, “माझ्या कुटुंबियांच्या…”

टीव्हीच्या लोकप्रिय कॉमेडी शो ‘लोलू सभा’मध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतरच त्यांना कॉमेडी किंग अशी ओळख मिळाली. शेषूने ‘गुलू गुलू’, ‘ए1’, ‘नई सेकर रिटर्न्स’, ‘डिकिलुना’, ‘द्रौपदी’, ‘अँटी इंडियन’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. संथानमच्या ‘वडक्कुपट्टी रामासामी’ या चित्रपटांमधून ते अखेरचे पडद्यावर दिसले होते. हा चित्रपट यावर्षी ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

Tags: entertainmentlakshmi narayan seshuLakshmi Narayanan Seshu DeathTamil Star Comedian
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Aditi Rao Hydari got married for the second time with actor Siddharth in Telangana

अदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याशी गुपचूप उरकलं लग्न, दोघांचंही झालं होतं पहिलं लग्न, घटस्फोट झाला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.