‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आणि हाअ मोठा बदल म्हणजे तितीक्षाचं लग्न. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर तितीक्षाने विवाहगाठ बांधली आहे. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी शाही थाटामाटात तितीक्षा व सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले आहेत.
लग्नासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर या साडीला साजेसा असा पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊजही परिधान केला होता. तर सिद्धार्थने तितीक्षाच्या लूकला साजेसा असा ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता व त्यावर धोतर परिधान केला होता. त्यांचा हा खास लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडला. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अशातच आता तिच्या लग्नातील आणखी एका खास क्षणाचा फोटो व्हायरल होत आहे आणि हा फोटो म्हणजे तितीक्षाच्या लग्नातील कानपिळीचा. तितीक्षाच्या लग्नात तिच्या भावाने सिद्धार्थचे कान पिळले आणि त्याचा हा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ-तितीक्षा यांच्या चेहऱ्यावर मनमोहक हसू दिसत आहे. तर तितीक्षाचा भाऊहे या खास फोटोमध्ये हसताना दिसत आहे. साईष तावडे असं तिच्या भावाचं नाव आहे.
“माझ्या बहिणीची काळजी घ्या” असं म्हणत तितीक्षाच्या भावाने हे खास फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, लग्नाआधी तिच्या भावाने अगदी थाटात दोघांचे केळवणदेखील पार पाडले होते. त्यावेळीही त्यांच्या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता या नवीन फोटोलाही सोशल मीडियावर तूफान प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या फोटोवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.