रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रत्नागिरीमध्ये पोहोचताच लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थान असलेल्या जागी पोहोचला संकर्षण कऱ्हाडे, मिसळही खाल्ली, म्हणाला, “येथील फेमस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 12, 2023 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Post

रत्नागिरीमध्ये पोहोचताच लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थान असलेल्या जागी पोहोचला संकर्षण कऱ्हाडे, मिसळही खाल्ली, म्हणाला, "येथील फेमस..."

अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्यातील बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. संकर्षण एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण एक संवेदनशील कवी, निवेदक, लेखक, दिग्दर्शकही आहे. संकर्षणच्या कविता ऐकणं ही तर रसिकांसाठी पर्वणीच असते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात काम करून तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. संकर्षण उत्तम कवी, अभिनेता आहेच शिवाय तो उत्तम निवेदकही आहे. विविध कार्यक्रमांचे निवेदन करताना तो दिसतो. (Sankarshan Karhade Post)

संकर्षण सध्या रंगभूमीकडे वळला असल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेक्षेत्रात मुशाफिरी करत असलेला संकर्षण सोशल मीडियावर देखील सक्रीय असतो. संकर्षण त्याच्या कामा संदर्भातील तसेच वैचारिक, काही मजेशीर तर कधी सामाजिक घडामोडींवर आधारीत पोस्टही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. शिवाय संकर्षण नेहमीच त्याच्या परदेश दौऱ्यादरम्यान आलेले अनुभवही सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो.

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ फेम तृप्ती डिमरीला एअरपोर्टवरच सगळ्यांनी ‘भाभी २’ म्हणून मारली हाक, अभिनेत्रीने केलं मोठं भाष्य, म्हणाली, “मला भाभी म्हटलं पण…”

अशातच संकर्षणने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त संकर्षण सध्या रत्नागिरी दौरा करण्यात व्यस्त आहे. संकर्षणने सोशल मीडियावरुन दौऱ्याला जातानाचे काही खास फोटो शेअर करत “‘रत्नागिरी’ शहरांत आल्या आल्या दिवसाची सुरवात अशी झाली. लोकमान्य टिळक जन्मस्थान आज मी पहिल्यांदाच पाहिलं. किती छान वाटलं. मग शहरातली फेमस ‘मिसळ आंबोळी’ खाल्ली. वाह. मज्जा आली. आता आज रात्री १० वा. प्रयोग आहे, तो ही खणखणीत होणार” असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – Video : आर्या आंबेकरची मोठी फसवणूक, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, “माझ्या परवानगीशिवाय त्यांनी…”

‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या प्रयोगानिमित कोकण दौऱ्यासाठी जात असतानाचे फोटो संकर्षणने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्यासह त्याची सहकलाकार अभिनेत्री अमृता देशमुखही दिसत आहेत. ही कलाकार मंडळी रत्नागिरी मधील फेमस अशा आंबोली उसळीचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

Tags: amruta deshmukhentertainmentmarathi dramamarathi playniyam va ati lagusankarshan karhade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
bigg boss vicky jain calls better cook to khanzaadi front of his wife ankita lokhande in upcoming episode

Bigg Boss 17 : "तीन वर्ष तू माझ्यासाठी…", विकी जैन बायकोला देत असलेली वागणूक प्रेक्षकांनाही पटेना, अंकिता लोखंडेला रडू कोसळलं, म्हणाली, "मी सगळं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.