मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आर्या आंबेकरची मोठी फसवणूक, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, “माझ्या परवानगीशिवाय त्यांनी…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 12, 2023 | 10:05 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi singer and actress aarya ambekar expressed her displeasure by sharing a video about a scam that happened to her

Video : आर्या आंबेकरची मोठी फसवणूक, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, "माझ्या परवानगीशिवाय त्यांनी..."

आपल्या सुमधुर आवाजाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री व गायिका म्हणजे आर्या आंबेकर. आर्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स् या लोकप्रिय कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचली व लोकप्रिय झाली. तिने आजवर अनेक गाण्यांसाठी पार्श्वगायन करत प्रेक्षकांच्या मनावर तिच्या आवाजाची छाप पाडली आहे. आर्याच्या गाण्यांची जितकी चर्चा होते. तितकीच ती तिच्या मनमोहक सौंदर्यानेदेखील चर्चेत असते. आर्या तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटो व गाण्याचे काही व्हिडीओ शेअर करत चाहत्यांबरोबर संपर्कात राहत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. (Aarya Ambekar On Instagram)

आर्याने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने तिच्याबरोबर झालेल्या एका फसवणुकीबद्दल सांगितलं आहे. तिने तिच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्वतः गायलेले काही अभंग एका युट्यूब वाहिनीने स्वतःच्या युट्युब वाहिनीवर पोस्ट केले असून त्या गाण्यांना आवाजही स्वतःचाच दिला आहे आणि या सगळ्याचा मनस्ताप व्यक्त करत आर्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या लाईव्ह गायनाच्या कार्यक्रमात काही प्रेक्षक इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबद्वारे व्हिडीओ करतात आणि हे व्हिडीओ ते त्यांच्या इन्स्टाग्राम पेजेस किंवा युट्यूब चॅनेलवर पोस्ट करतात. नुकताच मी मराठी अभंगाच्या गाण्यांचा कार्यक्रम सादर केला आणि या कार्यक्रमातील काही अभंगाचे व्हिडीओ कुणीतरी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केले आणि हे सगळं माझ्या परवानगीशिवाय झालं. तरीही हे सगळं साहिजक आहे म्हणून मी याकडे दुर्लक्ष केलं.”

View this post on Instagram

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

आणखी वाचा – “सत्ता येते जाते पण…”, देवेंद्र फडणवीसांना उद्देशून क्रांती रेडकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “खुर्ची पणाला लावून ते फक्त…”

यापुढे तिने “पण लेटेस्ट मराठी कीर्तन या युट्यूब चॅनेलने मात्र सगळी हद्दच पार केली आहे. मी माझ्या कॉन्सर्टमध्ये गायलेल्या काही गाण्यांचे व्हिडीओ काही लोकांनी युट्यूबवर पोस्ट केले. त्या व्हिडीओमधून माझा आवाज वेगळा करून ‘लेटेस्ट मराठी कीर्तन’ नावाच्या एका म्युजिक लेबलने अनेक गाण्याच्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या स्वतःच्या कॉपीराइटसकट आपलोड केले आणि हे सगळ माझ्या परवानगीशिवाय करण्यात आले आहे. या सगळ्यात मला काहीच करता येत नाही आहे, कारण या सगळ्यात मला माझ्या आवाजाचाच दावा करता येऊ शकतो. पण तोही मला करता येणार नाही. कारण या युट्यूब चॅनेलने माझा आवाजच काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे मला आता या सगळ्यात काय करावे हे सुचत नाही आहे. मी यांच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मी या चॅनेलच्या सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स शोधण्याचा प्रयत्न केला पण मला यासंबंधीत काहीच माहिती मिळाली नाही.” असं म्हटलं आहे.  

आणखी वाचा – Video : “जीजू कुठे आहेत?”, प्रश्न विचारताच लाजली पूजा सावंत, हसतच राहिली अन्…; म्हणाली, “ते लवकरच…”

दरम्यान, या व्हिडीओत तिने गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांचे कौतुक करत “मी या व्हिडीओत आवर्जून अवधूत गुप्ते यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी माझे सगळे म्हणणे ऐकून घेतले आणि माझी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला” असे म्हटले आहे. तसेच या सगळ्या प्रकरणात मला मदत केलेल्या सर्वांनाचं धन्यवाद म्हटले आहे. तसेच नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी तिच्या याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी तिला यासाठी पाठिंबा दिला आहे.

Tags: aarya ambekarentertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newsmarathi singer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Trupti Dimri On Bhabhi 2

‘अ‍ॅनिमल’ फेम तृप्ती डिमरीला एअरपोर्टवरच सगळ्यांनी 'भाभी २' म्हणून मारली हाक, अभिनेत्रीने केलं मोठं भाष्य, म्हणाली, "मला भाभी म्हटलं पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.