‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक संघर्षच पहायला मिळाला आहे. या घरातील जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहतात. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. अशातच या शोचा एक् नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्येही त्या दोघांमध्ये वाद होताना दिसत आहे. स्वयंपाक घरात जेवण बनवताना विकी अंकिताला जेवणावून टोमणा मारतो आणि त्याच्या बोलण्यामुळे तिला रडू येते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होतात. (Bigg Boss 17 New Promo)
या नवीन प्रोमोमध्ये, विकी खानजादीच्या जेवणाचे कौतुक करत आहे. तिला ‘चांगला स्वयंपाकी’ म्हणत अंकिताला त्याने टोमणा मारला आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होताना दिसत आहे. दरम्यान अंकिता, विकी व खानजादी स्वयंपाक करताना अंकिता खानजादीकडून काही सूचना घेत असते. तेव्हा विकी खानजादीला “तूच बनव” असं म्हणतो. यावर अंकिता “मी सुद्धा चांगले जेवण बनवू शकते”असं म्हणते. यावरुन त्यांच्यात बाचाबाची सुरू होते. यावेळी विकी अंकिताला “खानजादी तुझ्यापेक्षा जास्त चांगलं जेवण बनवते” असे उत्तर देतो. यावरूनच त्यांच्यात भांडणादरम्यान अंकिताला रडू येते आणि ती रडता रडताच हे जेवण मी बनवलं नसल्याचे विकीला सांगते.
PROMO #BiggBoss17 #VickyJain and #AnkitaLokhande fight again pic.twitter.com/JvUUDatB9E
— The Khabri (@TheKhabriTweets) December 11, 2023
यापुढे विकी “तू तीन वर्षात काय केलं आहेस?” असं बोलतो. यावर अंकिताही “मी सगळं प्रेमाने बनवत होती” असं म्हणत त्याला उत्तर देते. यावर विकी “हे सांगायची गरज नाही. शंभर लोक बघतात. शंभर लोक ऐकतात. तू कधीतरी प्रेमाने बोलत जा” असं म्हणतो. यावर अंकिताही त्याला म्हणते, “मी प्रेमानेच बोलत आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे” यावर विकी तिला “नाही, तू नाही करत आहेस. मी जास्त बोलत आहे असं तुला वाटतं असेल तर आजपासून माझ्याशी बोलणं बंद कर” असं रागाने म्हणतो. यावर अंकिताला आणखी रडू येते. ‘बिग बॉस’च्या घरात होणारे अंकिता-विकी यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही आहेत. त्यांच्यात सतत काहीना काही कारणावरून भांडण होत आहे. अशातच आणखी एका वादाची भर पडली आहे.
आणखी वाचा – Video : “जीजू कुठे आहेत?”, प्रश्न विचारताच लाजली पूजा सावंत, हसतच राहिली अन्…; म्हणाली, “ते लवकरच…”
दरम्यान, या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत विकी अंकिताबरोबर ज्यापद्धतीने वागला व बोलला आहे. त्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. विकी घरातील सर्वांबरोबर चांगलं वागताना दिसतो, पण तो अंकिताबरोबर असे का वागतो? विकी अंकिताबरोबर हे असं मुद्दाम वागत आहे? विकी कधीकधी अंकिताबरोबर खूपच विचित्र वागतो? तो हे असं ठरवून बागत असेल तर हे चांगले नाही, त्याच्या अशा वागण्यामुळे अंकिताची दया येते” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी विकीला खडे बोल सुनावले आहेत.