मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून आपण ज्याला ओळखतो तो म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. आजपर्यंत त्याने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याला आपण विविध विभागात विविध भूमिका साकारताना पाहिलं आहे.तो झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. त्याच्या अभिनयासह लिखाण, दिग्दर्शन तसेच त्याच्या कवितांचं सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. संकर्षण सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतीच त्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. (sankarshan karhade made fonicha bhat)
संकर्षण सध्या नाटक क्षेत्रात व्यस्त आहे. नुकतच त्याच ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. या नाटकात सहकलाकार म्हणून अभिनेत्री अमृता देशमुख काम करत आहे. हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक बरीच गर्दी करत आहेत. सध्या हे नाटक रंगभूमीवर सुपरहिट ठरत आहे. काही दिवसांपुर्वी संकर्षण या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेला आहे. तिथे वेगवेगळ्या शहरांमध्ये या नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. अशातच संकर्षणने तिथे जाऊन एक वेगळी जबाबदारी घेतलेली पहायला मिळाली.
संकर्षणने आताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तो कुक बनलेला पहायला मिळाला. अमेरिकेत जाऊन संकर्षण थेट स्वयंपाक घरात गेला. तो अमेरिकेत ज्यांच्या घरी राहत होता त्यांच्यासाठी त्याने नाश्त्याला फोडणीचा भात व फोडणीची पोळी असा बेत केला आहे. त्याने बनवलेला नाश्ता बघून तिथल्या ताई बऱ्याच खुश दिसत होत्या. या व्हिडीओला ‘आम्ही सारे खवय्ये इन अमेरिका. अमोल राजमाने व शुभदा राजमाने यांच्या घरी राहतोय… आज त्यांच्या स्वयंपाक घरात लुडबूड केली. मज्जा आली.’ , असं म्हणत त्याने कॅप्शन दिलं आहे.
या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांनीही व्हिडीओवर कमेंट करत त्यांच कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने तर, ‘पुढच्या सिंगापूरच्या ट्रीपमध्ये आम्हालाही तुझ्या हातचा हा पदार्थ खायला आवडेल’ असं म्हणत त्याच्या हातच्या जेवणासाठी आग्रह केला. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘तु खूप हुशार आहेस. कुठल्याही विषयावर छान बोलू शकतोस. खूप पुढे जा’, असं म्हणत त्यांचं कौतुक केलं.