मराठी सिनेसृष्टीमध्ये हँडसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेले जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं आकस्मिक निधन झाले. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला होता, म्हणूनच त्यांच्या अशा अचानक जाण्याने सिनेसृष्टी हळहळली. (ravindra mahajani postmortem)
रवींद्र महाजनी हे काही दिवसांपासून तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांच्या राहत्या घरामधून दुर्गंधी येत असल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना देताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला असता तिथे महाजनी यांचा मृतदेह आढळून आला.
रवींद्र महाजणींचा प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर (ravindra mahajani postmortem)
वडिलांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा गश्मीर मुंबईहून तळेगाव दाभाडेला आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला. थोड्याच वेळाने त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सोपवला जाईल, अशी माहिती मिळत आहे. साधारण दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असं अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाजनी यांचा अंतिम पोस्टमार्टमचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे.यांच्या पार्थिवावर काही वेळातच पुणे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाजनी यांच्या पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या मृतदेहावर कोणत्याही तीष्ण खुणा नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे.यांच्या पार्थिवावर पुणे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (ravindra mahajani postmortem)

रवींद्र महाजनींच्या सोसायटीत कचऱ्या गोळा करणाऱ्या ताईंनी त्यांना मंगळवारी शेवटचं पाहिलं होतं. त्या म्हणाल्या, “मी इमारतीत कचरा गोळा करायचे. त्यांच्याकडून पाण्याची बाटली घ्यायचे आणि त्यांना पुन्हा नेऊन द्यायचे. मंगळवारी त्यांनी स्वत: माझ्या हातात कचऱ्याची पिशवी दिली होती. कचरा घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले की मी त्यांचा दरवाजा ठोठवायचे. बुधवारी माझी सुट्टी होती. गुरूवारी सकाळी त्यांचा दरवाजा ठोठावला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मी दुपारीही त्यांच्या घरी गेले पण तेव्हाही दरवाजा बंद होता”.
हे देखील वाचा : रवींद्र महाजनी यांचं निधन पत्नीपासून ठेवलं लपवून, समोर आलं मोठं कारण