मराठी सिनेअभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अकाली निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तळेगाव दाभाडे येथे भाष्याच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. रवींद्र यांच्या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. रवींद्र महाजनी यांच्या राहत्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांत दिली. त्यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडून याचा शोध घेतला. (Ravindra Mahajani Death News)
पोलिसांच्या अनुमाने त्यांचा मृत्यू दोन दिवस आधीच झाल्याचं सांगण्यात आलं आहे. वडिलांच्या मृत्यूच्या बातमीने गश्मीर महाजनी निवासस्थानी पोहोचला. मात्र अद्याप रवींद्र महाजनी यांच्या पत्नीला रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी दिली नसल्याचं समोर आलं आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी गश्मीरला तातडीने देण्यात आली. मात्र रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूची बातमी ही अद्याप त्यांच्या पत्नीला देण्यात आलेली नाही आहे. त्यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे.
पाहा का लपवून ठेवलं मृत्यूचं कारण (Ravindra Mahajani Death News)
रवींद्र यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना अद्याप याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. रवींद्र महाजनी यांच्या पत्नी मुंबईत गश्मीरसोबत राहतात. तर रवींद्र हे गेले आठ महिने त्यांच्यापासून दूर राहत होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल पत्नीला अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही.
हे देखील वाचा – “देखणा नट गेला” रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा हळहळले
मुंबईचा फौजदार, देवता, जिवा सखा, पानिपत अशा अनेक दर्जेदार मराठी व हिंदी सिनेमांमधून रवींद्र महाजनी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या जोरावर रवींद्र महाजनी यांनी १९७५ ते १९९० हा काळ चांगलाच गाजवला. रवींद्र महाजनी यांच्या अचानक आलेल्या निधनाची बातमी ऐकून फक्त चाहत्यांमध्येच नाही तर मराठी सिनेविश्वात देखील मोठी खळबळ माजली आहे.
