मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड व ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मालिकाविश्वातून पदार्पण करण्याऱ्या सईने आतापर्यंत अनेक सिनेमे व वेबसिरीज केल्या असून मराठीबरोबर हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पाडली आहे. आपल्या बोल्ड व ब्युटीफुल अभिनयाने ओळखणारी सई तितकीच बिनधास्तदेखील असून तिच्या वर्कफ्रंटबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. आता या बोल्ड व बिनधास्त अभिनेत्रीने एक कबुली दिली असून ज्याची चर्चा जोरदार रंगतेय. (sai tamhankar viral video)
२०१३ साली रिलीज झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या सिनेमाला १० वर्ष पूर्ण होत आहे. अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, उर्मिला कोठारे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांनी डोक्यावर घेत त्याकाळात कमाईचे अनेक रेकॉर्डस् तोडलेत. सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे सर्व कलाकार व दिग्दर्शक संजय जाधव झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये आली. त्याचा प्रोमो नुकतंच समोर आला असून प्रोमोमध्ये सईने मजेशीर किस्सा सांगताना तिने आपल्या मित्राचे पैसे थकवले असल्याची कबुली दिली. (sai tamhankar in chala hawa yeu dya)
अखेर सईने दिली कबुली (sai tamhankar viral video in chala hawa yeu dya)

नुकताच आलेल्या शोच्या प्रोमोमध्ये भाऊ कदम सईला ‘MBA’ असं लिहिलेलं एक पुस्तक दाखवतो, ज्यावर सई खळखळून हसते. निलेश तिला याची काय भानगड असल्याचे विचारताच सईने कबुली दिली व म्हणाली, “मी एमबीएला ऍडमिशन घेतली होती. ज्या मित्राच्या वशिल्याने मी ऍडमिशन घेतले होते, त्याचे १५ हजार रुपये अजूनपर्यंत देणे बाकी आहे. पण मी ते पैसे त्याला कधीही देणार नाही.” पुढे एमबीएला ऍडमिशन घेण्यामागचं कारण विचारलं असता ती म्हणाली, “एक बॅकअप प्लॅन असावा म्हणून मी ऍडमिशन घेतलं पण त्याचं काही पुढे झालं नाही. म्हणून ती नवीकोरी पुस्तकं तशीच माझ्या घरात पडून आहे.” सईचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा : १७ व्या वर्षी सोडलं घर, करायचं होत कबड्डीमध्ये करिअर पण… वाचा काय आहे सईची स्ट्रगल स्टोरी
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठीसह हिंदी सिनेमे व वेब सिरीजसमध्ये सक्रिय असून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. काही दिवसांपूर्वीच सईने तिचा वाढदिवस बॉयफ्रेंड अनिश जोगसोबत स्पेनमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला, ज्याची चर्चा जोरदार रंगली होती.(sai tamhankar viral video)