काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रसाद ओकच्या घरी नवी कोरी आलिशान कार आली. सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली. मात्र ही आलिशान कार प्रसादने खरेदी न करता त्याच्या मोठ्या लेकाने त्याला गिफ्ट केली असल्याचं त्याने पोस्टमधून सांगितलं तेव्हा अगदी लहान वयात इतकं मोठं पाऊल उचललं म्हणून त्याचं भरभरुन कौतुकही करण्यात आलं. प्रसाद ओकचा मुलगा सार्थक याने स्वत:च्या वाढदिवशी त्याच्या बाबांना अत्यंत खास भेटवस्तू दिली. ही भेट पाहून प्रसाद व त्याची पत्नी मंजिरी दोघंही गहिवरले. (Prasad Oak On New Car)
खास पोस्ट शेअर करत आपल्या दोन्ही मुलांचं त्यांनी कौतुक केलं. या पोस्टबरोबर २२ वर्षांआधीचा फोटो शेअर करत तिने एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. अशातच आता प्रसादनेदेखील मुलाबद्दलच्या भावना व्यक्त करत नुकत्याच ‘अजब गजब’ या युट्युब वहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी लेकाने गाडी दिली त्या आलिशान गाडीबाबत भाष्य करत प्रसाद म्हणाला, “मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आलो आहे. त्यामुळे बीएमडब्ल्यू वगैरे घ्यायचं माझं काही स्वप्न नव्हतं. कारण मुळात मला गाड्यांमध्ये रस नाही”.
पुढे तो म्हणाला, “एक छोटी गाडी आहे आणि त्याने प्रवास होऊ शकतो इथेच माझी गाडीची गरज संपली. मला आलिशान गाड्यांची कधीच आवड नव्हती. मला मला महागड्या गाड्या खरेदी कराव्या असंही वाटलं नाही. गाडी असेल तर मोठा कलाकार समजतात या दृष्टिकोनावर माझा विश्वास नाही. कारण मी त्या नजरेने पाहतच नाही. पण माझ्या मुलाला माझ्याकडे आलिशान गाडी हवी असं वाटत होतं. मला गरज नाही असंही मी त्याला सांगितलं आहे. त्याऐवजी आपण घर घेऊ असं मी सांगायचो. यावर तो म्हणायचा, घर आपण घेऊच पण आता तू आलिशान गाडीतून फिरणार नाही तर केव्हा फिरणार?, असं त्याचं मत होतं”.
आणखी वाचा – निळू भाऊंच्या बायोपिकचं दिग्दर्शक करणार प्रसाद ओक, नव्या कलाकाराला देणार संधी, म्हणाला, “पुढच्या वर्षी…”
पुढे आलिशान गाडी का नको याबाबत बोलताना प्रसाद म्हणाला, “३० दिवसातील २५ दिवस तर मी शूटिंग करतो आणि शूटिंगला प्रॉडक्शनची गाडी असते. त्यामुळे त्या आलिशान गाडीचं काय करु?. तेव्हा माझा मुलगा नाहीच म्हणाला. यावरुन आमच्यात प्रचंड संभाषण, वाद झाले. आणि शेवटी त्याने त्याच्या वाढदिवसाला मला गाडी गिफ्ट केली. तो जर्मनीला असतो, त्याच्या वाढदिवसाचे निमित्त म्हणून तोच भारतात आला आणि त्यानेच मला गाडी गिफ्ट केली आणि तो गेला. इतक्या लहान वयात जिथे एक वडील मुलाला गाडी गिफ्ट करतो त्या वयात त्याने मला गाडी देणं हे माझ्या मुलावर माझ्या बायकोने केलेले संस्कार आहेत असं मला वाटतं. आणि त्याचंच हे फळ आहे”.