बुधवार, जुलै 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो पँट काढून समोर उभा राहिला अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ भयावह अनुभव, म्हणाली, “घाणेरडा स्पर्श, नजर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 21, 2024 | 3:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anita hanssnadani on hottifying incidence

अनीता हंसनंदानीच्या लहानपणी घडला भयंकर प्रसंग

अभिनेत्री अनीता हंसनंदानी सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेमुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. यामध्ये तिने साकारलेली नकारात्मक भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप भावली. तसेच रोहित रेड्डीबरोबर लग्नबंधनात अडकली असून तिला एक मुलगादेखील आहे. अनीता एका पॉडकास्टमध्ये हजर राहिली होती. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलसे केले आहेत. यामध्ये लहानपणी आलेल्या भयंकर प्रसंगाबद्दलही सांगितले आहे. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. (anita hanssnadani on hottifying incidence)

अनीताने नुकतीच ‘हउटरफ्लाई’ला मुलाखत दिली. तिने यामध्ये सांगितले की, “जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आई आम्हाला रिक्षाने जाण्यासाठी १० रुपये द्यायची. पण ते पैसे आम्ही वाचवायचो आणि येताना चालत यायचो. वाचलेले पैसे आम्ही कँटिनमध्ये खाऊ खाण्यासाठी वापरायचो. पण जेव्हा आम्ही चालत यायचो तेव्हा एक रिक्षावाला असायचा. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी जायचो तेव्हा तो पॅंट काढून उभा राहायचा व स्वतःला वेगळ्या पद्धतीने स्पर्श करायचा व खूप घाणेरड्या नजरेने बघायचा”.

आणखी वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पटकावली सव्वा लाखाची पैठणी, सहअभिनेत्रींनी उचलून घेतलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

पुढे ती म्हणाली की, “त्याच्या भीतीमुळे आम्ही आमचा रस्तादेखील बदलला. पण तो आमचा पाठलाग करेल अशी भीती वाटायची. मी मुलींच्या शाळेत शिकायचे आणि त्या रिक्षावाल्याला आमचा रस्ता माहीत होता. त्यामुळे कोणतीही रिक्षा आली की आम्ही खूप घाबरायचो”.

आणखी वाचा – बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईमध्ये मोठा अपघात, वांद्रेमधील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल, प्रकृती गंभीर

दरम्यान अनीताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती दिव्यांका त्रिपाठी व करण पटेल यांच्याबरोबर ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेमध्ये दिसून आली होती. तसेच सध्या ती ‘सुमन इंदौरी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. यामध्ये तिच्याबरोबर श्वेता गौतम, जैन इमाम व अशनूर कौरदेखील दिसून येत आहेत.दरम्यान या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या एजाज खान बरोबर असलेल्या नात्याबद्दलदेखील भाष्य केले होते. अनिताच्या आईचा या नात्याला पाठिंबा नसल्याचेदेखील तिने सांगितले होते. तसेच हिंदू-मुसलमान असा फरक असल्यानेही तिने एजाजबरोबरचे नातं संपवल होतं.

Tags: actingactressanita hansnandaniTelevision
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Madhurani Prabhulkar Funny Video

शेजारच्यांच्या प्लेटमध्ये बघून ऑर्डर कशी द्यायची?, 'आई कुठे…'मधील अरुंधतीने हॉटेलमध्येच बसून शूट केली रील, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.