गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Photos : पिंक थीम, आकर्षक डेकोरेशन अन्…; एक वर्षाची झाली राहुल वैद्यची लेक, कुटुंबियाची जंगी बर्थडे पार्टी

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 21, 2024 | 6:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
disha parmar daughter birthday celebration

दिशा परमार व राहुल वैद्यच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा

टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमार ही सध्या खूप चर्चेत आहे. आजवर ती अनेक हिंदी मालिकांमध्ये दिसून आली. तसेच ‘बिग बॉस’च्या १४ पर्वामध्ये दिसून आली होती. तिच्याबरोबर यामध्ये गायक राहुल वैद्यदेखील सहभागी झाला होता. यावेळी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबंधनात अडकले. दिशा व राहुल यांना २०२३ साली कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव नव्या असे ठेवण्यात आले. नुकताच नव्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. (disha parmar daughter birthday celebration)

दिशा व राहुलने लेकीचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्यांनी वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राहुल व दिशाने नव्याच्या वाढदिवसाची बार्बी थीम ठेवली होती. यामध्ये डेकोरेशनपासून केक हे सगळं काही गुलाबी रंगामध्ये होतं. वाढदिवस साजरा करण्याच्या वेळी लाल रंगाचा फ्रॉक घातला होता. तसेच डोक्यावर हेअर बॅंडदेखील लावला असल्याने ती अजूनच यामध्ये ती खूप गोड दिसत होती. तसेच दिशाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून राहुलने नीळी जीन्स व पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. नव्याच्या वाढदिवसाला तिच्या दोन्ही आजीदेखील पोज देताना दिसल्या.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’चा टीझर प्रदर्शित, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमची चित्रपटात वर्णी, कलाकारांच्या लूकने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Disha Parmar Vaidya (@dishaparmar)

राहुलने फोटो शेअर करत लिहिले की, “नवू बाबा, माझ्या पहिल्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. नव्याला शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार”. दिशा व राहुलने केलेल्या पोस्टवर सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिशानेदेखील सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये लाडक्या लेकीबरोबर सर्व एंजॉय करताना दिसत आहे. दरम्यान त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसून येत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा टीआरपी वाढला, रितेश देशमुखचं यश पाहून बायको भारावली, म्हणाली, “नवा रेकॉर्ड बनवत….”

दिशा परमार व राहुल वैद्य ‘बिग बॉस’मधील त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर दोघेही एकमेकांना वाचन दिल्याप्रमाणे लग्नबंधनात अडकले. आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूजही त्यांनी चाहत्यांसह शेअर केली. अखेर दिशाने गोंडस अशा मुलीला जन्म दिला. दिशा व राहुलने ख्रिसमसच औचित्य साधत तिच्या लेकीचा चेहरा दाखवला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळत होतं.

Tags: birthday celebrationdisha parmarrahul vaidya
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan expressed his displeasure after being interrupted by Paddy Kamble and Janhavi Killekar in the house

Bigg Boss Marathi : "आता एकटाच खेळणार, नडणार आणि…", पॅडी बोलल्यानंतर सूरज चव्हाण भडकला, म्हणाला, "शांत बसतो म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.