मराठी सिनेविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांनी एक काळ इतका गाजवलाय की त्यांचं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या कारकिर्दीचा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर उभा राहतो. आपल्या उत्तम अभिनयशैलीने या कलाकार मंडळींनी त्यांच्या चाहत्यांना बांधून ठेवलं. अशाच हाडाच्या कलावंतांपैकी एक नाव आजही आपण आवर्जून घेतो ते नाव म्हणजे दिग्गज सिनेअभिनेते निळू फुले. आज जरी हे जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्यात नसली तरी त्यांची जागा प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या मनात आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित लवकरच बायोपिक येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. (Prasad Oak On Nilu Phule Biopic)
निळू फुले यांनी २५० पेक्षा जास्त मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक लवकरच दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. तो या चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत बोलताना नुकत्याच ‘अजब गजब’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाला, “निळू भाऊंबरोबर मी ‘प्रेमाची गोष्ट’ हे नाटक केलं आहे. आणि मला दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळाला हे माझं भाग्य आहे. या नाटकामुळे मला निळू भाऊंचा सहवास लाभला. त्यांचा प्रत्येक चित्रपट मी पाहिला आहे”.
आणखी वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पटकावली सव्वा लाखाची पैठणी, सहअभिनेत्रींनी उचलून घेतलं अन्…
पुढे तो म्हणाला, “मी त्यांच्यासाठी वेडा आहे. त्यांचं प्रचंड वाचन आहे हे या क्षेत्रात आल्यावर मला कळलं. राष्ट्रसेवा दलबरोबर त्यांचं असलेलं असोसिएशन, समन्वयी पक्षात त्यांचं काम, माणूस म्हणून त्यांनी केलेलं काम आणि अभिनेता म्हणून केलेलं काम अशा चार ट्रक वर त्यांचं काम पाहून मला त्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडली. निळू भाऊंवर बायोपिक यायलाच हवा एवढं काम त्यांचं आहे. फक्त बाई वाड्यावर या एवढयापुरतं निळू भाऊ नाही आहेत, त्यांचं खूप काम आहे आणि अशा या दिग्गज व्यक्तिमत्त्वच काम लोकांपर्यत पोहचावं हाच हेतू आहे. तो माणूस मला खूप आवडतो. नाटकामुळे मी त्यांच्या जास्त जवळ आलो. तेव्हा मी गार्गीकडे बायोपिकसाठी परवानगी मागितली आणि मला मिळाली”.
आणखी वाचा – लवकरच नव्या घरात राहायला जाणार अंशुमन विचारे, पहिल्यांदाच दाखवले inside photo , व्हिडीओ समोर
चित्रपटाबाबत बोलताना प्रसाद म्हणाला, “गेली दोन सव्वा दोन वर्ष चित्रपटाचा लेखक संशोधन करत आहे. आणि तो चित्रपट लिहून पूर्ण झाला आहे. पुढच्या वर्षी मी हा चित्रपट घेऊन फ्लोरवर जाईल. मात्र या चित्रपटात निळू भाऊंची भूमिका कोण करणार हे अद्याप ठरलेलं नाही. मला स्वतःला चित्रपटात काम करायला आवडलं असतं पण ते दिग्दर्शनाबरोबर शक्य नाही. कारण चित्रपटाचा खूप तामझाम आहे. मला या चित्रपटात एका नव्या कलाकाराला घ्यायला आवडेल. आणि नव्या चेहऱ्याला संधी द्यायला आवडेल”.