‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. या कार्यक्रमाचे लाखो चाहते दिवाने आहेत. अगदी जगभरात या कार्यक्रमाचे चाहते असून या कार्यक्रमाने साऱ्यांना खळखळवून हसवलं आहे. हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी स्कीटने व अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. यांतील कॉमेडीची क्वीन म्हणून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रताने तिच्या हटके कला कौशल्याने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Namrata Sambherao Son)
प्रत्येक कलाकाराला शूटिंगमधून वेळ काढून कुटुंबाच्या जवळ राहणं खूप महत्त्वाचं असतं. खऱ्या आयुष्यात नम्रता एक पत्नी, आई व अभिनेत्री अशा जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळते आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून नम्रता आपल्या कामाशी एकनिष्ठ असल्याने प्रेक्षक तिचं विशेष कौतुक करतात. नम्रता संभेरावच्या लेकाचं नाव रुद्राज असं आहे. नम्रताप्रमाणे रुद्राजही बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. नम्रता नेहमीच लेकाबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असते. नम्रता व तिच्या लेकाचं खास बॉण्डिंग असलेलं नेहमीच पाहायला मिळतं.
रुद्राजचा एक खास व्हिडीओ नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत नम्रताचा लेक रुद्राज त्याच्या पहिल्या इंटरनॅशनल टूरचा एन्जॉय घेताना दिसत आहे. “रुद्राजची पहिली इंटरनॅशनल टूर सिंगापूर, तू माझा आनंद आहेस” असं कॅप्शन देत रुद्राजचा सिंगापूर येथे धमाल-मस्ती करतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुद्राजही त्याची ही ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहे.
सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम त्यांच्या कुटुंबियांसह सिंगापूर दौरा करण्यात व्यस्त आहे. सिंगापूर येथे एन्जॉय करतानाचे अनेक फोटो ही कलाकार मंडळी शेअरही करत आहेत. त्यांची ही सिंगापूर ट्रिप सगळ्यांसाठी खास असल्याचं त्यांच्या फोटो, व्हिडीओवरुन कळत आहे. दरम्यान नम्रता तिच्या पतीसह व लेकासह ही सिंगापूरची ट्रिप एन्जॉय करत आहे.