शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पुष्पा २’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 17, 2024 | 3:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Allu Arjun much awaited Pushpa 2 movie trailer launch event see the details

अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित पुष्पा २ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचबद्दल जाणून घ्या...

‘पुष्पाः द राइज’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला आणि आता या चित्रपटाचा दूसरा भाग ‘पुष्पाः द रुल’ हा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द रुल’ अखेर ०५ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याआधी या चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. या भव्य ट्रेलर लॉंचसाठी चित्रपटाची टीम पटणा इथे पोहोचली आहे. ‘पुष्पा २’चा आगामी व बहूप्रतिक्षित ट्रेलर १७ नोव्हेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. (Pushpa 2 Trailer)

‘पुष्पा २’ चा ट्रेलर आज म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानावर संध्याकाळी ५ वाजता प्रदर्शित होणार आहे. यासाथी ‘पुष्पा २’ टीमचे अनेक स्टार्स दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यक्रमात भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा सिंग दमदार परफॉर्मन्स करणार आहे. पुष्पा मूव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार पाटणा ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होणार आहे. लोकप्रिय भोजपुरी स्टार अक्षरा सिंग ‘पुष्पा २’ ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये खास परफॉर्मन्स देणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Pushpa (@pushpamovie)

आणखी वाचा – प्रसिद्ध सरोद वादक आशिष खान यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

गांधी मैदान, पाटणा येथे सायंकाळी ५ वाजता लॉन्च होईल. तर ‘पुष्पा २’ चित्रपटाचा हिंदी ट्रेलर टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केला जाईल. संध्याकाळी ६ वाजता यूट्यूबवर प्रदर्शीत होईल. या कार्यक्रमाची संपूर्ण झलकही यूट्यूबवर थेट पाहता येणार आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाचा ट्रेलर तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली आदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त, दिग्दर्शक सुकुमार देखील ‘पुष्पा २’ ट्रेलर रिलीज इव्हेंटमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ०५ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – Video : लेकाच्या वाढदिवसानिमित्त विशाखा सुभेदारांनी शेअर केला भावुक व्हिडीओ, म्हणाल्या, “बऱ्याचदा असं होतं की…”

हिंदी ट्रेलर लॉन्चसाठी पटणा हे ठिकाण निवडणे हे अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्याने हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी उचललेले एक धाडसी पाऊल दर्शवते. निर्मात्यांनी नमूद केले की हा उपक्रम चित्रपटाला नवीन उंची गाठण्यास मदत करेल.

Tags: Allu Arjun Pushpa 2 Newspushpa 2 TrailerPushpa 2 Trailer News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actress Savita Malpekar commented that there is no unity among Marathi artists and industry

“आपले कलाकार कधीच एकत्र येऊ शकत नाहीत”, सविता मालपेकरांचे 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, “एकत्र आले असते तर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.