सरोद वादक आशिष खान यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. या महान सरोद वादकाने अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे अखेरचा श्वास घेतला. आशिष खान हे अशा कलाकारांपैकी एक आहेत ज्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जगात एक ओळख दिली. जॉर्ज हॅरिसन, एरिक क्लॅप्टन आणि रिंगो स्टार यांसारख्या आंतरराष्ट्रीय संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. खान यांचे गुरुवारी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील रुग्णालयात निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांचा भाऊ आलम खान यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, माझा मोठा भाऊ, सरोद वादक आणि मैहर घराण्याचे खलिफा उस्ताद आशिष खान यांचे निधन झाले आहे. (Saroj player Ashish Khan Passes Away)
गेल्या दोन दिवसांपासून ते रुग्णालयात होते. त्यांचे भाऊ उस्ताद आलम खान यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. पुतण्या शिराज खाननेही आशिष खान यांच्या निधनाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली. “आम्ही भाग्यवान आहोत की तो आमच्या आयुष्यात आहे आणि तो नेहमी आमच्या हृदयात राहील” असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. आशिष एक उत्कृष्ट सरोद वादक आणि संगीतकार होते. त्यांच्या संगीताने अनेक संगीतकार आणि श्रोत्यांना प्रेरणा दिली आहे.
आणखी वाचा – ठरलं तर मग! नागा चैतन्य व शोभिता ‘या’ दिवशी विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल
आशिष खान यांचा जन्म १९३९ मध्ये एका संगीतमय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा उस्त अलाउद्दीन खान आणि वडील उस्त अली अकबर खान हे देखील उत्कृष्ट सरोद वादक होते. त्यांनीच आशिष खानला प्रशिक्षण दिले. आशिष खान यांनी लहानपणापासूनच भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
आशिष खान यांना २००६ मध्ये त्यांना ग्रॅमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. २००४ मध्ये आशिष खान यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशिष यांना आपले कौशल्य जगभर पोहोचवायचे होते. त्यामुळेच त्यांनी अमेरिका आणि कॅनडातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.