शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हेमंतने कुठल्याही बडेजावशिवाय…”, ‘झिम्मा २’नंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “मनोरंजन व्हावं म्हणून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 24, 2023 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actor abhijeet khandkekar shared her reaction on instagram post about marathi movie jhimma 2

“हेमंतने कुठल्याही बडेजावशिवाय...”, 'झिम्मा २'नंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, "मनोरंजन व्हावं म्हणून..."

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. झिम्माच्या अभूतपूर्व यशानंतर या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोरोना काळानंतर झिम्मा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. दरम्यान या चित्रपटावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.   (Actor Abhijeet Khandkekar shared Post About Jhimma 2)

अशातच अभिनेता अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत ‘झिम्मा २’चे कौतुक केले आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटातील कलाकारांबरोबरचे काही खास क्षण शेअर करत कॅप्शनमध्ये पोस्ट केली आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “झिम्माच्या पहिल्या भागाने अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडल्यानंतर दुसऱ्या भागात काय असेल याची खूप उत्सुकता होती आणि हेमंतने मला अजिबात नाराज केले नाही. चार-पाच वेगवेगळ्या बायका, त्यांना ट्रीपवर घेऊन जाणारा एक तरूण आणि ह्या संपूर्ण प्रवासात त्यांनाच नाही तर आपल्यालाही पुन्हा नव्याने कळणाऱ्या कितीतरी गोष्टी या चित्रपटात आहेत. साध्या-सोप्या कथेत हेमंतने अतिशय सुरेख रंग भरले आहेत.” 

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’मध्ये राखी सावंत व आदिल खान दुर्रानी येणार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “कोणालाही प्रसिद्धी…”

यापुढे त्याने असं लिहिलं आहे की, “मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी करावं की एखाद्या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर प्रबोधन करावं ह्या सगळ्याच्या सीमा तोडत कथा कशी मांडावी तर झिम्माच्या कथेसारखी. इरावतीचं लिखाण कधी स्क्रिप्ट वाटतच नाही. यातील प्रत्येक बाईचा स्वभाव, पार्श्वभूमी, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. पण त्यांचं एकत्र येणं तुम्हाला हसवतं, रडवतं व अंतर्मुख व्हायला भाग पाडतं.” यापुढे त्याने हेमंत व चित्रपटातील कलाकारांचे कौतुक करत असे म्हटले आहे की, ‘झिम्मा २’ मध्ये कितीतरी विषयांना योग्य रीतीने हाताळत निर्मिती ताई, सुहास ताई, क्षिती, सुचित्रा ताई अश्या बाप अभिनेत्रींना मुक्त सोडत, सिद्धार्थ, सायली, शिवानी, रिंकू अश्या अनेक कलाकारांकडून खुबीने त्यांची पात्र साकारून घेत आणि मुख्य म्हणजे कुठल्याही बडेजावशिवाय हेमंतने हा ‘महाझिम्मा’ सहजतेनं घातलाय.” 

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता-मन्नारा यांच्यात कडाक्याचं भांडण, ढसाढसा रडत म्हणाली, “कुणी काहीही…”

यापुढे त्याने चित्रपटातील प्रत्येक कलाकारांचे वैयक्तिक कौतुक करत असे म्हटले आहे की, “सुहास ताईंनी वेगवेगळे पदर गुंता होऊ न देता अलगद उलगडून दाखवलेत, सुचित्रा ताईसारखी आत्या तर प्रत्येक कुटुंबात असतेच. निर्मिती ताई नुसती पडद्यावर दिसली तरी हास्याचे स्फोट होतात ही तीची ताकद. क्षितीच्या सीनची तर वाट बघावी आणि तीने सिक्सरच मारावा. सायली जशी दिसते, आहे त्याउलट पात्र तिने साकारलं आहे. एवढ्या सगळ्या बायकांना सांभाळणारा कबीर सिद्धूने अतिशय सुरेख साकारला आहे. या सगळ्या जुन्या कलाकरांमध्ये रिंकु व शिवानी नवीन असुनही त्यांनी सुंदर कामं केली आहेत.” यापुढे त्याने लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांना धन्यवाद म्हणत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.     

Tags: abhijeet khandkekarentertainment newsjhimma 2marathi actormarathi entertainmentmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Jhimma 2 New Character

'झिम्मा २' मधील 'हा' परदेशी अभिनेता नेमका आहे तरी कोण? खुद्द हेमंत ढोमेने केला खुलासा, म्हणाला, "आपली भाषा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.