बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरी सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अभिनेत्याची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. अशातच आयरा व नुपूर यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांच्या घरी महाराष्ट्रीयन पध्दतीने केळवण पार पडले. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता नुपूरच्या घरी हळद समारंभाची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकतेच हळदी समारंभासाठी तयार झालेल्या खान परिवाराचे व्हिडीओ समोर आले आहेत.
आयराच्या लग्नानिमित्त रिना दत्त व किरण राव यांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे. आमिर खानच्या लेकीच्या लग्नात त्याची पत्नी किरण राव व रिना दत्त यांचा सहभाग पाहायला मिळाला. यासाठी दोघींनी नऊवारी साधी परिधान करत केसात गजरा माळल्याचे पाहायल मिळाले. दोघींचा व इतर कुटुंबीयांचा हा पारंपरिक अंदाज सोशल मीडियावर साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – Video : बसमध्ये सागर कारंडेचा वाढदिवस दणक्यात साजरा, धमाल सेलिब्रेशन केलं अन्…; व्हिडीओ व्हायरल
या सोहळ्यामध्ये अभिनेता आमिर खान मात्र कुठेही दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आयरा व नूपुरच्या लग्नात किरण राव व रिना दत्त यांसह त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचा सहभाग असल्याचे दिसून आले. यासाठी त्यांनी खास महाराष्ट्रीयन लुक केल्याचेदेखील पाहायला मिळाले. मात्र या सोहळ्यात आमिर खानची अनुपस्थिती सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी आमिरने लेकीच्या प्रत्येक सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आयराच्या हळदी समारंभातील व्हायरल फोटो व व्हिडीओमध्ये आमिर खान नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. अशातच सोशल मिडियावर नुकत्याच आलेल्या एका व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांनी त्याला हळदी समारंभाबाबत विचारले असता अमिरने मी आत्ताच झोपून उठलो असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आयरा व नुपूरचे लग्न ३ जानेवारी रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यांपैकी एक रिसेप्शन हे दिल्लीत असणार आहे तर दुसरं रिसेप्शन हे जयपूरमध्ये असल्याचं म्हटलं जातं आहे. इरा व नुपूर २०२०पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.