गेले काही दिवस मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन सृष्टीतील मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिष व गौतमी-स्वानंद हे कलाकार विवाहबंधनात अडकले. त्याचबरोबर गेल्या महिन्यात छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ फेम मानसी घाटे व ‘रमा राघव’ फेम सोनल पवार यांचेही लग्न पार पडले आहे. अशातच आता ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेमधील एक अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला असून लवकरच ही अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. (Kaumudi Walokar On Instagram)
‘आई कुठे काय करते?’ मधील आरोही म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकरने चाहत्यांना वर्षाअखेरीस सुखद धक्का दिला आहे. कौमुदीचा ३१ डिसेंबरला थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. याचे खास क्षण शेअर करून तिने चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत “उद्या आपल्या आयुष्याचे पोस्टर उघड होत आहे.” त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी तिने थेट साखरपुड्याचे फोटो शेअर केले. “या वर्षाच्या शेवटी आम्ही आमचा नवा अध्याय सुरू करत आहोत,” असं लिहित कौमुदीने सोशल मीडियावर होणारा नवरा आकाश चौकसेबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा – Video : बसमध्ये सागर कारंडेचा वाढदिवस दणक्यात साजरा, धमाल सेलिब्रेशन केलं अन्…; व्हिडीओ व्हायरल
कौमुदीच्या साखरपुड्याच्या पोस्टवर अनेक् मराठी कलाकार मंडळींनी कमेंट्सद्वारे तिचे अभिनंदन केले आहे. मालिकेतील मधुराणी प्रभूलकर, अश्विनी महांगडे, कृतिका देव, अक्षया गुरव, नेहा शितोळे, अमृता देशमुख यासंह अभिनेता अभिषेक देशमुख व निपुण धर्माधिकारी यांनी कौमुदी व आकाशला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कौमुदीच्या अनेक् चाहत्यांनीदेखील या पोस्टखाली कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत झळकली होती. तर ‘शाळा’ चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटांटुन्न प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.