शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खूप दुःख…”, ‘दंगल’मधील छोट्या बबिता फोगटच्या निधनानंतर आमिर खान हादरला, भावना अनावर, म्हणाला, “सुहानीसारखी तरुण मुलगी…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 17, 2024 | 5:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actor Aamir Khan expresses his grief on the news of Suhani Bhatnagars death shares a tweet and pays condolences

"खूप दुःख...", 'दंगल'मधील छोट्या बबिता फोगटच्या निधनानंतर आमिर खान हादरला, भावना अनावर, म्हणाला, "सुहानीसारखी तरुण मुलगी..."

हिंदी मनोरंजन नुकतीच एक दु:खद बातमी समोर आली. ‘दंगल’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं निधन झालं असून वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला. ‘दंगल’ चित्रपटात छोटी बबिताची भूमिका साकारणाऱ्या सुहानीने तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटात आमिर खान हा मुख्य भूमिकेत होता. सुहानीच्या निधनाचे वृत्त समोर येताच तिच्याअ अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं.

अशातच आता आमिर खाननेही सुहानीच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त केला आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर आमिर खानच्या प्रॉडक्शन कंपनीकडून एक ट्विट जाहीर करण्यात आले आहेत. ज्यात असं म्हटलं आहे की, “सुहानीच्या निधनाबद्दलचे वृत्त ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आहे. तिची आई पूजा व तिच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्या मनःपूर्वक संवेदना. सुहानीसारख्या अत्यंत हुशार व तरुण मुलीशिवाय ‘दंगल’ चित्रपट अशक्यच होता.” 

We are deeply saddened to hear about our Suhani passing away.

Our heartfelt condolences to her mother Poojaji, and the entire family ????????

Such a talented young girl, such a team player, Dangal would have been incomplete without Suhani.

Suhani, you will always remain a star in…

— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) February 17, 2024

आणखी वाचा – Video : घट्ट मिठी मारली, किस केलं आणि…; पुरस्कार मिळताच भर कार्यक्रमात रितेश देशमुखने बायकोला दिलेली वागणूक पाहून सर्वत्र कौतुक, व्हिडीओ व्हायरल

यापुढे या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, “सुहानी, तू आज आमच्यात शरीराने नसलीस तरीदेखील तू नेहमीच आमच्या हृदयात राहशील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो हीच देवाचरणी प्रार्थना.” आमिर खानकडून अभिनेत्रीच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले गेले आहे. तसेच या ट्विटखाली अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे सुहानीला श्रद्धांजली वाहिली आहे.  

आणखी वाचा – अधिपतीला अक्षरापासून वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीची नवी खेळी, ‘तुला शिकवीन…’मध्ये नवं वळण, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले…

दरम्यान, सुहानी भटनागरच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तिच्या पायाच्या फ्रॅक्चरवर उपचार सुरु होते. यावेळी तिने घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम होऊ लागले. या उपचारादरम्यान तिच्या शरीरात द्रवपदार्थ तयार होऊ लागले, ज्यामुळे सुहानीचा मृत्यू झाला. सुहानीच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला आहे. 

Tags: aamir khanbollywood actorbollywood actressbollywood newsDangal Fame ActressSuhani BhatnagarSuhani Bhatnagar DeathSuhani Bhatnagar Death Newsआमिर खानदंगल फेम अभिनेत्रीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीसुहानी भटनागरसुहानी भटनागर मृत्यूसुहानी भटनागर मृत्यू बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
Allu Arjun Pushpa movie

'पुष्पा' चित्रपटाचा तिसरा भागही येणार, अल्लु अर्जुनची मोठी घोषणा, दुसरा भाग यादिवशी होणार प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.