हिंदी मनोरंजन नुकतीच एक दु:खद बातमी समोर आली. ‘दंगल’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं निधन झालं असून वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला. ‘दंगल’ चित्रपटात छोटी बबिताची भूमिका साकारणाऱ्या सुहानीने तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटात आमिर खान हा मुख्य भूमिकेत होता. सुहानीच्या निधनाचे वृत्त समोर येताच तिच्याअ अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं.
अशातच आता आमिर खाननेही सुहानीच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त केला आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर आमिर खानच्या प्रॉडक्शन कंपनीकडून एक ट्विट जाहीर करण्यात आले आहेत. ज्यात असं म्हटलं आहे की, “सुहानीच्या निधनाबद्दलचे वृत्त ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आहे. तिची आई पूजा व तिच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्या मनःपूर्वक संवेदना. सुहानीसारख्या अत्यंत हुशार व तरुण मुलीशिवाय ‘दंगल’ चित्रपट अशक्यच होता.”
We are deeply saddened to hear about our Suhani passing away.
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) February 17, 2024
Our heartfelt condolences to her mother Poojaji, and the entire family ????????
Such a talented young girl, such a team player, Dangal would have been incomplete without Suhani.
Suhani, you will always remain a star in…
यापुढे या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, “सुहानी, तू आज आमच्यात शरीराने नसलीस तरीदेखील तू नेहमीच आमच्या हृदयात राहशील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो हीच देवाचरणी प्रार्थना.” आमिर खानकडून अभिनेत्रीच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले गेले आहे. तसेच या ट्विटखाली अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे सुहानीला श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, सुहानी भटनागरच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तिच्या पायाच्या फ्रॅक्चरवर उपचार सुरु होते. यावेळी तिने घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम होऊ लागले. या उपचारादरम्यान तिच्या शरीरात द्रवपदार्थ तयार होऊ लागले, ज्यामुळे सुहानीचा मृत्यू झाला. सुहानीच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला आहे.