बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पुष्पा’ चित्रपटाचा तिसरा भागही येणार, अल्लु अर्जुनची मोठी घोषणा, दुसरा भाग यादिवशी होणार प्रदर्शित

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 17, 2024 | 5:29 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Allu Arjun Pushpa movie

'पुष्पा' चित्रपटाचा तिसरा भागही येणार, अल्लु अर्जुनची मोठी घोषणा, दुसरा भाग यादिवशी होणार प्रदर्शित

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन व अभिनेत्री रश्मिका मंदना यांच्या ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली आहे. २०२१मध्ये तेलगू भाषेबरोबरच इतर अनेक भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला गेला. २०२३मध्ये अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ मधील दमदार भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील गौरविले गेले. यावर्षी ‘पुष्पा’ चा पुढील भाग ‘पुष्पा २ : द रुल’ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून ‘पुष्पा’चा तिसरा भाग येऊ शकतो अशा चर्चा रंगत आहेत. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. (Allu Arjun Pushpa movie)

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा:द राईज’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. यावर्षी चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल चर्चा केली जात होती. पण आता खुद्द अल्लू अर्जुननेच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’चा तिसरा भागदेखील भेटीला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या दरम्याने ‘पुष्पा २’ बद्दल बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला की, “‘पुष्पा’च्या पहिल्या भागातील भूमिकेपेक्षा या दुसऱ्या भागातील भूमिका पूर्णतः वेगळी असणार आहे. या भागामध्ये तुम्ही एक केवळ छोटासाच भाग पाहिला आहे. पण ‘पुष्पा’ च्या दुसऱ्या भागामध्ये याचा वेगळा पैलू तुम्ही पाहू शकता”.

आणखी वाचा -अधिपतीला अक्षरापासून वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीची नवी खेळी, ‘तुला शिकवीन…’मध्ये नवं वळण, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

याबरोबरच अल्लू अर्जुन पुढे म्हणाला की, “आता ‘पुष्पा 3’ मध्ये तुमचे अधिकच मनोरंजन होणार आहे”. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागामध्ये पोलीस अधिकारी भंवर सिंह शेखावत व पुष्पा यांच्यामधील संघर्ष पाहायला मिळाला. तसेच पुढील भागामध्ये रश्मिकाची भूमिका नक्की काय असेल याबद्दलही चर्चा होत आहे. आता पुढे हे कथानक कसे वळण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आणखी वाचा -“खूप दुःख…”, ‘दंगल’मधील छोट्या बबिता फोगटच्या निधनानंतर आमिर खान हादरला, भावना अनावर, म्हणाला, “सुहानीसारखी तरुण मुलगी…”

‘पुष्पा २ : द रुल ‘ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाची अगदी चातकासारखी वाट बघत आहेत. सुट्टीच्या दिवशी ‘पुष्पा २’ प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळू शकतो अशाही शक्यता वर्तवल्या जात आहेत.

Tags: allu arjunfahadPushpa moviepushpa part 2pushpa part 3rashmika mandanasouth movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Know the real reason of Dangal fame Suhani Bhatnagar's death see the details

औषधांचा दुष्परिणाम, आजार वाढला अन्...; गोळ्यांनीच घेतला ‘दंगल’मधील छोट्या बबिता फोगटचा जीव, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.