शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपतीला अक्षरापासून वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीची नवी खेळी, ‘तुला शिकवीन…’मध्ये नवं वळण, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 17, 2024 | 4:07 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial new twist video viral on social media

अधिपतीला अक्षरापासून वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीची नवी खेळी, ‘तुला शिकवीन...'मध्ये नवं वळण, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

‘झी मराठी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशातच या मालिकेतील नव्या ट्विस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मालिकेतील कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.

अशातच या मालिकेचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात भुवनेश्वरी अधिपतीला तिच्या बाजूने वळवून घेण्यासाठी त्यांची मनधरणी करताना दिसत आहे. यात भुवनेश्वरी अधिपतीला समजावत असं म्हणते की, “आम्ही आमच्या सूनबाईंच्या नवऱ्याला काही बोलू शकत नाही, कारण त्यांचा त्यांच्या नवऱ्यावर (अधिपती)वर हक्कच आहे. पण आमचा लेक जर चुकीच्या वाटेला जात असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही.”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

व्हिडीओमध्ये पुढे ती असं म्हणते की, “तुमचं नवरा-बायकोचं एक वेगळं जग आहे आणि आपल्या आई-मुलाचं एक वेगळं नातं आहे. एवढं लक्षात ठेवा.” यापुढे अधिपतीही आईला “बस्स आईसाहेब तुम्ही हे इतकं बोललात तेच माझ्यासाठी खूप आहे. तुमच्या या बोलण्याने माझ्या मनावरचं ओझं कमी झालं आहे.”

आणखी वाचा – Video : घट्ट मिठी मारली, किस केलं आणि…; पुरस्कार मिळताच भर कार्यक्रमात रितेश देशमुखने बायकोला दिलेली वागणूक पाहून सर्वत्र कौतुक, व्हिडीओ व्हायरल

नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल भागात अधिपतीने बायकोला व्हॅलेंटाईन निमित्त खास सरप्राइज दिलं होतं. पण अक्षराने ते सरप्राइज नाकारत तिथून निघून गेली होती. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियांद्वारे प्रतिसाद दिला होता. अशातच या व्हिडीओवरही नेटकऱ्यांनी अधिपतीला त्याच्या आईची खरी बाजू आणि पत्नीची खरी किंमत कधी कळणार? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा – बायको रस्त्यावरच्या पुरुषांना खाणाखुणा करुन घरी बोलावत असल्याचा रविंद्र महाजनींनी केलेला आरोप, माधवी महाजनी म्हणाल्या, “कहर झाला…”

दरम्यान, मालिकेचे कथानक प्रेक्षकांचे मन वळवून घेण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता मालिकेत yenaryया या नवीन ट्विस्टमुळे आता पुढे नवीन काय पाहायला मिळणार? याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.     

Tags: adhipatiaksharabhuvaneshwarimarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi serialstula shikvin changlach dhadaअक्षराअधिपतीतुला शिकवीन चांगलाच धडा’ मराठी मालिकाभुवनेश्वरीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Suhani Bhatnagar Last Post

'दंगल'मधील छोट्या बबीता फोगटची शेवटची पोस्ट व्हायरल, कॅप्शनमध्ये दिलेल्या शब्दात दिला होता मृत्यूचा संकेत ?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.