बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : घट्ट मिठी मारली, किस केलं आणि…; पुरस्कार मिळताच भर कार्यक्रमात रितेश देशमुखने बायकोला दिलेली वागणूक पाहून सर्वत्र कौतुक, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 17, 2024 | 2:13 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Ritesh Deshmukh has received this years director's award for Maharashtracha favorite kon 2023

Video : घट्ट मिठी मारली, किस केलं आणि...; पुरस्कार मिळताच भर कार्यक्रमात रितेश देशमुखने बायकोला दिलेली वागणूक पाहून सर्वत्र कौतुक, व्हिडीओ व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय पुरस्कार सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कार सोहळा. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १८ जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सोहळ्याला अनेक नामांकित कलाकार आपली हजेरी लावून या सोहळ्याची शान वाढवतात.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या यंदाच्या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे काही प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यापैकी एका प्रोमोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये ‘महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक’ हा पुरस्कार रितेश देशमुखला मिळत असल्याची घोषणा करण्यात येते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

यापुढे रितेश हा पुरस्कार स्वीकारायला स्टेजवर जातो आणि त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला वहिला पुरस्कार त्याच्या पत्नीला समर्पित करतो. यावेळी तो असं म्हणतो की, “जिनिलीया या माझ्या आयुष्यातील पहिली व्यक्ती आहे, जिने मला सांगितलं की मी दिग्दर्शक व्हावं. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिला पुरस्कार जिनिलीया तुमच्यासाठी आहे.”

आणखी वाचा – Video : श्रीवर्धनमध्ये घर, समुद्रकिनारा अन्…; साखरपुड्यानंतर सासरवाडीमध्ये पोहोचला प्रथमेश परब, जावयाचं असं झालं स्वागत

रितेश-जिनिलीया यांच्या या नवीन प्रोमोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच ‘महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक २०२३’ हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त अनेकांनी रितेश यांचे अभिनंदनही केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या अनेक चाहत्यांनी रितेशचा काळा सूट व जिनिलीयाची लाल रंगाची नेटची साडी हा खास लूक आवडला असल्याचेही म्हटले आहे.

आणखी वाचा – मन धागा धागा जोडते नवा! पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा सोहळा संपन्न, कलाकारांची गर्दी अन्…

दरम्यान, यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या चित्रपटाने तब्बल नऊ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. यासंबंधित हातात पुरस्कार घेतलेले फोटोही रितेश-जिनिलीया यांनी शेअर केले होते. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स, कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव केला होता.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
shark tank fame aman gupta

"अमन गुप्ताचं नशिबंच फाटकं आणि…", 'शार्क टँक इंडिया'मध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकाचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाला, "चेक फाडला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.