शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायको व मुलीला सोडून अभिषेक बच्चनचा आई व बहीणीबरोबर प्रवास, नेटकरी म्हणाले, “अशा मुलांशी कधीच लग्न करु नये जे…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 28, 2024 | 4:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Abhishek Bachchan spotted with mother Jaya and sister Shweta Nanda leaving Aishwarya and Aaradhya

ऐश्वर्या व आराध्याला सोडून अभिषेक बच्चनचा जया व श्वेता नंदाबरोबरचा प्रवास, नेटकऱ्यांचा संताप

बॉलिवूडचे लोकप्रिय व प्रसिद्ध जोडपे म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय. या दोघांमधील मतभेदाबद्दल व त्यांच्या नात्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चर्चा होत आहेत. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. ऐश्वर्या व तिची मुलगी आराध्याशिवाय बच्चन कुटुंबाला पाहिलं की, सगळ्यांना धक्काचं बसतो आणि त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दलच्या या चर्चांना आणखीनच वाव मिळतो. अंबानी कुटुंबातील लग्नात अभिषेक आई जया बच्चन आणि बहीण श्वेता नंदाबरोबर मुंबई विमानतळावर दिसला होता. तेव्हा चाहत्यांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली तो म्हणजे “ऐश्वर्या कुठे आहे?” यावरुन अनेकजण अभिषेक, जया आणि श्वेता यांना टोमणे मारत आहेत.

अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संपूर्ण बच्चन कुटुंबीय एकत्र दिसत आहेत. अभिषेक बच्चन मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसला. त्यांच्याबरोबर आई जया बच्चन आणि बहीण श्वेता नंदाही होत्या. मात्र या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या दिसत नाहीये. त्यामुळे या व्हिडीओवर आता नेटकरी व अनेक चाहते मंडळी बच्चन कुटुंबियांमुळे चर्चा करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर एकाने लिहिले आहे की, “वाईट कुटुंब, एवढ्या चांगल्या अभिनेत्रीचे आयुष्य उद्ध्वस्त केले.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “जेथे विवाहित नणंद घरावर राज्य करते, तिथे सूनेचे घर कधीच स्थिरावत नाही”.  

आणखी वाचा – “मुझे छोड़ कर जो तुम जाओगे…” Bigg Boss Marathi च्या घरातील स्पर्धक घेणार अरबाज-निक्कीची फिरकी, गायलं ब्रेकअप Song

तसंच या व्हिडीओखाली अनेक लोकांनी अभिषेकवरही राग व्यक्त केला. त्याच्या पत्नीला सोडून वागण्याबद्दल अनेकांनी त्याला टोमणे लगावले आहेत. याबद्दल एकाने म्हटलं आहे की, “अभिषेक त्याच्या आई आणि बहिणीबरोबर प्रवास करतो आणि पत्नी आणि मुलगी एकट्याने प्रवास करतात. वाह!” तसंच आणखी एकाने म्हटलं आहे की, “या माणसाला पत्नी आणि मुलगी आहे हे माहित आहे का?” त्याचबरोबर दुसऱ्याने असं म्हटलं आहे की, “अशा मुलांशी कधीच लग्न करू नये जे आपल्या पत्नी आणि मुलांसाठी भूमिका घेऊ शकत नाहीत”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मला घरात बोलवा आणि…”, अरबाजचा राग, निक्कीचं वागणं पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “महिलांचा आदर…”

दरम्यान, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्याबद्दल बोलायचे झाले तर या दोघांनी 2007  साली मोठ्या थाटामाटात लग्न केलं. यानंतर ऐश्वर्याने २०११ मध्ये मुलगी आराध्याला जन्म दिला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र सहभागी झाले होते आणि ऐश्वर्या-आराध्या या दोघी वेगळ्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन कुटुंबापासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags: abhishek bachchanAISHWARYA RAIjaya bachchanshweta nanda
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Bhide Master aka actor Mandar Chandwadkar shares the truth about rumors of he is quiting the show

दयाबेन, तारक मेहता, टप्पू, गोलीनंतर मास्तर भिडेही 'तारक मेहता…' सोडणार?, अभिनेता म्हणाला, "दुःख झालं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.