बॉलिवूडचे लोकप्रिय व प्रसिद्ध जोडपे म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय. या दोघांमधील मतभेदाबद्दल व त्यांच्या नात्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चर्चा होत आहेत. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. ऐश्वर्या व तिची मुलगी आराध्याशिवाय बच्चन कुटुंबाला पाहिलं की, सगळ्यांना धक्काचं बसतो आणि त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दलच्या या चर्चांना आणखीनच वाव मिळतो. अंबानी कुटुंबातील लग्नात अभिषेक आई जया बच्चन आणि बहीण श्वेता नंदाबरोबर मुंबई विमानतळावर दिसला होता. तेव्हा चाहत्यांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली तो म्हणजे “ऐश्वर्या कुठे आहे?” यावरुन अनेकजण अभिषेक, जया आणि श्वेता यांना टोमणे मारत आहेत.
अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संपूर्ण बच्चन कुटुंबीय एकत्र दिसत आहेत. अभिषेक बच्चन मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसला. त्यांच्याबरोबर आई जया बच्चन आणि बहीण श्वेता नंदाही होत्या. मात्र या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या दिसत नाहीये. त्यामुळे या व्हिडीओवर आता नेटकरी व अनेक चाहते मंडळी बच्चन कुटुंबियांमुळे चर्चा करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर एकाने लिहिले आहे की, “वाईट कुटुंब, एवढ्या चांगल्या अभिनेत्रीचे आयुष्य उद्ध्वस्त केले.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “जेथे विवाहित नणंद घरावर राज्य करते, तिथे सूनेचे घर कधीच स्थिरावत नाही”.

तसंच या व्हिडीओखाली अनेक लोकांनी अभिषेकवरही राग व्यक्त केला. त्याच्या पत्नीला सोडून वागण्याबद्दल अनेकांनी त्याला टोमणे लगावले आहेत. याबद्दल एकाने म्हटलं आहे की, “अभिषेक त्याच्या आई आणि बहिणीबरोबर प्रवास करतो आणि पत्नी आणि मुलगी एकट्याने प्रवास करतात. वाह!” तसंच आणखी एकाने म्हटलं आहे की, “या माणसाला पत्नी आणि मुलगी आहे हे माहित आहे का?” त्याचबरोबर दुसऱ्याने असं म्हटलं आहे की, “अशा मुलांशी कधीच लग्न करू नये जे आपल्या पत्नी आणि मुलांसाठी भूमिका घेऊ शकत नाहीत”.
दरम्यान, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्याबद्दल बोलायचे झाले तर या दोघांनी 2007 साली मोठ्या थाटामाटात लग्न केलं. यानंतर ऐश्वर्याने २०११ मध्ये मुलगी आराध्याला जन्म दिला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र सहभागी झाले होते आणि ऐश्वर्या-आराध्या या दोघी वेगळ्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन कुटुंबापासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे.