Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा कालचा (२७ ऑगस्ट) भाग चांगलाच गाजला. या घरातील भांडण व वाद काही नवीन नाहीत. मात्र काल अरबाजच्या वागण्याने सर्वचा सीमा ओलांडल्या. बिग बॉसच्या घरात काल तुफान राडे झाले. या राड्यात अरबाजने घरची आदलाआपट ही केली आणि याची त्याला शिक्षाही मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की अन् अभिजीतची मैत्री पहिल्या दिवसापासून अरबाजला खटकत होती. अशातच गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर निक्कीला तिचे मित्रमंडळी तिच्याविषयी मागून कसे गॉसिप करतात याच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या. यामुळे निक्की भयंकर संतापली आणि तिने ‘ए’ ग्रुपमधून एक्झिट घेतली. निक्कीने तिचा ग्रुप सोडल्यावर घरात जोड्यांनी वावरण्याचा नवीन टास्क सुरू झाला. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
यामध्ये ‘बिग बॉस’ने निक्की आणि अभिजीत या आठवड्यात जोडी असेल असं जाहीर केलं. एकंदर निक्कीचं कोणतंच वागणं अरबाजला पटत नव्हतं. त्यामुळे कालच्या (२७ ऑगस्ट) भागात दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. निक्की अरबाजला पूर्णवेळ समजवत होती. मात्र, घरातील इतर सदस्य निक्की फक्त गेमसाठी हे करतेय…अरबाज तिच्या नादी लागू नकोस असा सल्ला त्याला देत होते. निक्की समजूत काढायला जवळ जाताच अरबाज प्रचंड भडकतो आणि किचनमध्ये त्याने भांडी फोडल्याचं पाहायला मिळालं.

अरबाजच्या या वागणुकीवर प्रसिद्ध मराठी अभिनेता व बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक पुष्कर जोगने भाष्य केलं आहे. पुष्करने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत अरबाजच्या वागणुकीवर त्याचं म्हणणं मांडलं आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “हा कार्यक्रम अरबाज आणि निक्कीच्या लव्हस्टोरीबद्दल नाही. प्रिय जोडी (अरबाज-निक्की) तुम्ही यातून बाहेर येणार आहात का?” तसंच त्याने यापुढे असं म्हटलं आहे की, “या घरात असं वागण्याला परवानगी आहे का? ही आक्रमकता? हे निंदनीय वर्तन? ‘बिग बॉस’ कृपया मला या घरात बोलवा. घरातल्या इतर महिलांच्या विवेकाचा आदर करा. त्यांना भीती वाटू लागली आहे. काही पुरुष भूमिका घेतात”.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात एवढा मोठा राडा झाल्यावर सर्व सदस्यांना ताबडतोब लिव्हिंग एरियामध्ये जमण्याचे आदेश देण्यात आले. “घरात तोडफोड करणं अत्यंत चुकीचं आहे” असं ‘बिग बॉस’कडून अरबाजला सांगण्यात आलं. तसेच याची शिक्षा म्हणून या आठवड्यात अरबाजकडून कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे. ‘बिग बॉस’च्या या निर्णयामुळे अरबाजला दु:ख होतं आणि तो रडू लागतो. तेव्हा घरातील बाकी सदस्य त्याची समजूत काढतात.