Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मंगळवारी निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार वादावादी झाली. निक्कीवर चिडलेल्या अरबाजचे अभिजीतबरोबरही खटके उडाले. वादावादी व संतापाच्या भरात अरबाजने घरातील वस्तूंची आदळाआपट केली. या सगळ्या घडामोडींमुळे ‘बिग बॉस’च्या घरात काही वेळेसाठी तणावाचे वातवरण तयार झाले होते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच नात्यांची नवी समीकरण तयार होतात. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात निक्की, अरबाज, अभिजीत यांच्याबाबतही नात्यांची नवी समीकरण तयार झालेली पाहायला मिळत आहेत. मात्र भागात घरातील सदस्य निक्की-अरबाजची फिरकी घेताना दिसणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
निक्की-अरबाजच्या भांडणांची फिरकी घेण्यासाठी घरातील सगळे सदस्य एकत्र जमून विरहाची गाणी गात असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या नव्या प्रोमोमध्ये सूरज, आर्या व जान्हवी “ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी”, “मुझे छोड़ कर जो तुम जाओगे… बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे” ही गाणी गाणार आहेत. त्यावर घरातील इतर सदस्यही मजा घेताना दिसत आहेत. यावेळी अरबाज व निक्कीदेखील हसतानाचे पाहायला मिळत आहे,. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज चांगलाच माहोल बनणार आहे आणि त्यामुळे रोज भांडण व वादविवाद पाहणाऱ्या प्रेक्षकांना आजच्या भागात मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
निक्कीने टीम A ला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजीतचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. त्यात बिग बॉस’ने मानकाप्याच्या टास्कसाठी निक्की व अभिजीतची जोडी केली आहे. यामुळे अरबाजला कुठे तरी दुःख होत असून त्याला असुरक्षितताही वाटत आल्याचे दिसून येत आहे. त्यात कालच्या भागात अरबाजने निक्कीवर रागावून घरात आदळआपटही केली. निक्कीमुळे तो दुखावला गेला असून रागाच्या भरात त्याने घरात राडा केला. राग अनावर होत त्याने घरातील वस्तू फेकून दिल्या.
दरम्यान, पाचव्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी निक्की, अभिजीत, वर्षा आणि अंकिता हे चार सदस्य नॉमिनेट झालेत. नॉमिनेशनसाठी ‘मानकाप्या’ हे कार्य पार पडलं. घरातील सदस्य हे सध्या जोड्यांमध्ये बांधले गेले आहेत. त्यामुळे नॉमिनेशनही जोड्याचं झालं आहे. त्यामुळे आता या नॉमिनेशनमध्ये कोण बाहेर जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.