शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लक्ष्याच विंगेत उभं राहून लेकाला…”, वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, म्हणाला, “माझं पहिलं नाटक त्यांनी बघितलं असतं तर…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 31, 2024 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhinay Berde shares a memory about late actor and his father Laxmikant Berde see the details

अभिनयने शेअर केली बाबा लक्ष्मीकांत बेर्डेंची भावुक आठवण, म्हणाला, “ते आज असते तर...”

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर रंगभूमीही गाजवली. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. त्यांचा जीवनप्रवास हा नवोदित कलाकार मंडळींसाठी नेहमी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुलगा अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट बराच गाजला. त्यानंतर अनेक चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. त्यानंतर आता अभिनय एका नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Abhinay Berde Shared Memory Of His Father)

अभिनय हा लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा असून त्याने अनेकदा आपल्या वडिलांविषयीची आठवण व्यक्त केली आहे. अशातच अभिनयने नुकतीच सन मराठीवरील ‘होऊ दे चर्चा’ या कार्यक्रमात वडिलांबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या. यावेळी त्याला एक फोटो दाखवण्यात आला. ज्यामध्ये अभिनय लक्ष्मीकांत यांच्या कडेवर असून त्याने एक हात वर केला आहे. या फोटोबद्दल तो असं म्हणाला की, “माझा स्वभाव बघता मी तेव्हा खूप खादाड असेन. त्यामुळे मी काहीतरी खायलाचं मागत असेन”.

View this post on Instagram

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

यापुढे अभिनयने वडिलांची आठवण सांगत असं म्हटलं की, “त्यांचं नेहमी एक म्हणणं असायचं की, प्रत्येक नवीन कलाकाराने थिएटर केलं पाहिजे, नाटकांमधून काम केले पाहिजे. कारण नाटकांत काम करुन तुम्हाला जी शिकवण मिळते ती दुसरीकडे कधीच मिळणार नाही. ‘आजीबाई जोरात’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि या नाटकाची पहिली घोषणाही त्यांच्याच आवाजात आहे. जी AI च्या माध्यमातून आम्ही आणली आहे. तर ते आज असते आणि त्यांनी माझं पहिलं नाटक बघितलं असतं तर बरं झालं असतं”.

आणखी वाचा – तरुण वयातच नवऱ्याला गमावलं, ५४व्या वर्षीही एकटीच राहते सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता जगत आहे असं आयुष्य

यापुढे अभिनय असं म्हणाला की, “एकदा पुरुषोत्तम बेर्डे माझं नाटक बघायला आले होते. तेव्हा त्यांनी नाटकाविषयी खास लिहिलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, नाटकाची उद्घोषणा झाल्यानंतर सर्वात आधी स्टेजवर मीच दिसतो. तर असं वाटतं की, जणू काही लक्ष्याच विंगेत उभं राहून आपल्या लेकाला प्रोत्साहन देत आहे”.

आणखी वाचा – व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन बघतात अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक खुलासे, नक्की चाललंय काय?

दरम्यान, अभिनयच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तो ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’ व ‘बॉईज ४’सारख्या चित्रपटांत झळकला आहे. सध्या रंगभूमीवर त्याचे ‘आजीबाई जोरात’ हे नाटक जोरात चालत आहे आणि या नाटकाला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत आहे.   

Tags: abhinay berdelaxmikant berdemarathi actorMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fifth week Riteish Deshmukh Bhaucha Dhakka new promo out.

Bigg Boss Marathi : "तुझा त्रास, राग खोटा आणि…", रितेश देशमुख अरबाजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार, टीम बीचीही झोप उडणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.