हेमा समितीच्या अहवालामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात महिलांच्या छळाचे अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. अहवालामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून अहवाल समोर आल्यानंतर अभिनेत्री आणि इंडस्ट्रीतील अन्य महिला त्यांच्यावर झालेले शरीर, लैंगिक आणि मानसिक शोषण यावर आवाज उठवताना दिसत आहेत. या आरोपांनंतर अनेक दिग्गज कलाकारांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. अशातच आता दिवंगत अभिनेते ऋषी कपूर स्टारर ‘नसीब अपना अपना’ या चित्रपटातील अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनीदेखील मोठा खुलासा केला आहे. महिलांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे लावल्याचा खुलासा राधिका सरथकुमार यांनी केला आहे. (Radhika Sarathkumar On Vanity Van Hidden Camera)
नुकताच एका मुलाखतीत राधिका सरथकुमार यांनी मल्याळम इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने असं म्हटलं आहे की, “केरळमध्ये जेव्हा मी एका चित्रपटाचं शुटिंग करत होती, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, काही लोकं एका ठिकाणी जमा होऊन काही तरी पाहत आहेत. तेव्हा मी एका क्रू मेंबरला विचारलं, कसला गोंधळ सुरु आहे तिकडे? तेव्हा त्याने मला सांगितलं व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे आहेत. त्या कॅमेऱ्यांमध्ये महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले जात आहेत. ती व्यक्ती मला म्हणाली, फक्त अभिनेत्रीचं नाव टाईप करा आणि कपडे बदलण्याचा व्हिडीओ सुरु होतो. मीदेखील व्हिडीओ पाहिला आहे”. इंडस्ट्रीमधील सत्य माहिती झाल्यानंतर राधिका सरथकुमार यांना मोठा धक्का बसला. स्वतःच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाण्यासाठीही त्यांनी भीती वाटत होती.
आणखी वाचा – “देव येऊनच स्वच्छ करतील”, नदीतील कचरा पाहून भडकला शशांक केतकर, म्हणाला, “सण महत्त्वाचे पण…”
याबद्दल राधिका म्हणाल्या की, “घडलेल्या घटनेबद्दल मी अन्य महिलांनादेखील सांगितलं. त्यानंतर मला स्वतःला व्हॅनमध्ये जायची भीती वाटू लागली. व्हॅनिटी व्हॅन म्हणजे कपडे बदलण्यासाठी, आराम करण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी खासगी जागा असते”. मल्याळम इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींच्या लैंगिक छळाच्या बातम्या समोर येत आहेत आणि यात यामध्ये सीपीआय(एम) आमदार आणि अभिनेता मुकेश, अभिनेते जयसूर्या, एडावेला बाबू तसेच मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रंजित यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे.
आणखी वाचा – तरुण वयातच नवऱ्याला गमावलं, ५४व्या वर्षीही एकटीच राहते सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता जगत आहे असं आयुष्य
दरम्यान, न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर येताच अनेक अभिनेत्री आपल्यासोबत घडलेल्या घटनांबद्दल उघडपणे बोलू लागल्या आहेत. मल्याळम इंडस्ट्रीतील गोंधळात नुकतेच सुपरस्टार मोहनलाल यांनीही मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची 17 सदस्यीय कार्यकारिणी होती. समितीच्या सर्व सदस्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.