मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दीड वर्ष दारुच प्यायलो, तेव्हा नशेमध्येच…”, पहिल्या घटस्फोटानंतर आमिर खानची होती अशी अवस्था, म्हणाला, “एकटेपणामुळे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 30, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir khan talk about his first divorce

“दीड वर्ष दारुच प्यायलो, तेव्हा नशेमध्येच...”, पहिल्या घटस्फोटानंतर आमिर खानची होती अशी अवस्था, म्हणाला, “एकटेपणामुळे...”

आमिर खान त्याच्या कामामुळे नावारुपाला आला. पण त्याचबरोबरीने त्याचं खासगी आयुष्य अधिक टॉक ऑफ द टाऊन ठरलं. आमिरने दोन घटस्फोटानंतर पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता त्याने चक्क गर्लफ्रेंड गौरीची सगळ्यांना ओळख करुन दिली आहे. रिना दत्त या आमिरच्या पहिल्या पत्नी. २००१मध्ये आमिर व रिना एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र हा धक्का आमिरला काही पचवता आला नाही. रिना घर सोडून जाताच आमिर डिप्रेशनमध्ये गेला. त्याला दारूचं व्यसन लागलं. याचबाबत आमिरने आता भाष्य केलं आहे. त्याने तेव्हाची खरी परिस्थिती सगळ्यांसमोर मांडली. (Aamir khan talk about his first divorce)

आमिर आणि रिना दत्त यांनी अगदी कमी वयामध्ये लग्न केलं होतं. २००१मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र घटस्फोटानंतर आमिर डिप्रेशनमध्ये होता. इतकंच काय तर दारूच्या व्यसनाधीन झाला होता. याबाबत त्याने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. सत्य परिस्थिती सांगताना तो रडला. आमिर म्हणाला, “ज्या दिवशी रिना माझ्या घरातून निघून गेली तेव्हा एकटेपणा खायला उठला. घरात कोणीच नव्हतं. मला एकटं एकटं वाटू लागलं. मला समजतच नव्हतं की, मी काय करु?”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेता उभारतोय स्वप्नातील बंगला, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Abu Jani Sandeep Khosla (@abujanisandeepkhosla)

पुढे तो म्हणाला, “त्यादिवशी शेवटी मी दारूची एक बॉटल संपूर्ण प्यायलो. त्यानंतर पुढच्या दिड वर्षांमध्ये मी दारूच पीत राहिलो. रोज रात्री मी दारू प्यायचो. दारू पिऊन झोपायचो नाही तर नशेच आपोआपच मी बेशुद्ध होत होतो”. यादरम्यानच्या काळात आमिरसाठी त्याचे इंडस्ट्रीमधील मित्र-मंडळी धावून आले. याबाबत तो म्हणाला, “अचानक एक दिवस जुही चावलाचा फोन आला. तुला भेटायचं आहे, असं तिने मला सांगितलं. सात वर्ष जुही आणि माझं काहीच बोलणं झालं नव्हतं. भेटण्यासाठी मी तिला होकार दिला. जुही घरी आल्यानंतर मला म्हणाली, मी पेपरमध्ये वाचलं की, रिना आणि तुझं ब्रेकअप झालं आहे. तुम्ही दोघंही वेगवेगळे राहत आहात. मी हा म्हणून उत्तर देताच तिने आम्हाला पुन्हा एकत्र येण्याचा सल्ला दिला. पुन्हा जाऊन पॅचअप कर असं ती म्हणाली”.

आणखी वाचा – २० तास वेदना, मृत बाळाला जन्म अन् नवऱ्याची सततची मारहाण; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केलेला धक्कादायक खुलासा, म्हणालेली…

आमिरच्या या पडत्या काळात सलमान खाननेही त्याची बरीच साथ दिली. घरी एकटाच असल्यामुळे आमिर कोणाला भेटायलाही नकार द्यायचा. मात्र सलमान घरी येऊन त्याच्याबरोबर बसायचा, जेवायचा. आमिर याचविषयी म्हणाला, “तेव्हा मी एकटाच असायचो. कोणाला भेटायची इच्छाच व्हायची नाही. जुही जशी मला भेटायला आली तसा सलमानही आला होता. माझ्याकडे जेवायला तो आला आणि बऱ्याच गप्पा-गोष्टीही झाल्या. तेव्हा मी डिप्रेशनमध्ये असल्यामुळे माझ्या सगळ्या मनातल्या गोष्टी सलमानला सांगितल्या. त्यानेही मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. २००१ ते २००२दरम्यान सलमान आणि माझ्यामध्ये मैत्री झाली”. आमिर अजूनही रिना यांच्या संपर्कात आहे.

Tags: aamir khanbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Shefali Jariwala  Sudden Death

सत्यनारायण पूजेचा उपवास, फ्रिजमधील अन्न खाल्लं अन्…; शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं कारण उघड, शिळं खाणं पडलं महागात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.