Nisha Rawal Married Life : ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेतील कलाकारांना मालिकेने विशेष पसंती मिळवून दिली. या मालिकेतील कलाकार खऱ्या आयुष्यातही एकमेकांबरोबर दिसले. एक काळ असा होता मालिकेतील नैतिक म्हणजेच अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांची जोडी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय जोडी होती. पण मुलाच्या जन्मानंतर या जोडप्यात खटके उडू लागले आणि त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत घटस्फोट घेतला. ‘नच बलिए’मध्येही या जोडीने आपल्या केमिस्ट्रीने आणि बाँडिंगने सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते, परंतु आता दोघांनाही एकमेकांचे तोंड पाहायलाही आवडत नाही.
टीव्ही उद्योगातील अभिनेत्री निशा रावल हिचे लग्नानंतर वैयक्तिक आयुष्य विशेष चर्चेत राहिले. गर्भधारणेदरम्यान अभिनेत्रीने बरेच सहन केले जे खूप वेदनादायक होते. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे. निशाने आजवर बर्याच मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती पाच महिन्यांची गर्भवती असताना तिला गर्भपात करावा लागला. अभिनेत्रीने सांगितले की असे करण्यास ती एकटी गेली होती.
निशाने सांगितले की या कठीण काळात तिच्याबरोबर कोणीही नव्हते. मुलाच्या हृदयात तीन छिद्र होती आणि एकापेक्षा जास्त गुणसूत्र होते. अभिनेत्रीने सांगितले की २० तासांच्या अधिक वेदनेनंतर मी जिवंत नसलेल्या मुलाला जन्म दिला. मला फक्त खंत वाटते की मी त्या पोटात वाढवलेल्या मुलाला पाहिलेसुद्धा नाही. अभिनेत्री म्हणाली की, गर्भपात झाल्यानंतरही तिचा नवरा करण मेहरा तिला सतत मारत असे. अभिनेत्री पुढे म्हणाली की तिला आपल्या मुलासाठी करणसारखे वडील कधीच नको होते. अभिनेत्री म्हणाली की या सर्वादरम्यान तिला बाइलोपर डिसऑर्डर झाला होता. यावेळी, तिने तिच्या नवऱ्यापासून स्वत: ला पूर्णपणे वेगळे केले होते.
आणखी वाचा – शेफालीच्या अस्थी हृदयाशी धरुन ढसाढसा रडला पराग त्यागी, बायकोचं नसणं सहन होईना, व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक
करण मेहराचा त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलसोबतचा खटला दीड-दोन वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले. निशा रावलने करणवर मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता, तर करणने निशाविरुद्ध एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा गुन्हा दाखल केला.





