बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. मिस्टर परफेक्शनिस्टची लेक आयरा खान लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या ३ जानेवारीला ही जोडी शाही विवाह करणार असून या जोडीच्या लग्नाच्या तयारींना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी या जोडीचा केळवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यानंतर लग्नापुर्वीच्या विधींना नुकतीच सुरुवात झाली आहे. आयराच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (ira khan pre-wedding ceremonies)
इराने तिच्या लग्नापूर्वीच्या विधीचे दोन फोटोज इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये आयराने मराठमोळा पेहराव परिधान केला आहे. गुलाबी रंगाची साडी, त्यावर टिकली आणि फुलांचा साजशृंगार तिने केला असून या मराठमोळ्या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तर तिचा बॉयफ्रेंड नुपूर्णे यावेळी पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून ज्यामध्ये तो खूपच देखणा दिसत आहे. तसेच, या फोटोमध्ये आयरा नूपुरला किस करताना दिसली. दरम्यान, तिने या फोटोजला काही कॅप्शन दिलं नाही. मात्र, तिचे हे फोटोज नुपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध अभिनेता वरुण तेजच्या लग्नाचा इटलीत शाही थाट, तर भारतातील रिसेप्शन सोहळ्याने वेधलं लक्ष, पाहा फोटो

आयराचा भावी पती नुपूर शिखरे हा मूळचा पुण्याचा आहे. तो सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर असून सुश्मिता सेन, टायगर श्रॉफ यांसारख्या अनेक कलाकारांना त्याने फिटनेसचं प्रशिक्षण दिले. शिवाय, तो उत्तम डान्सर देखील आहे. गेल्या काही वर्षांपासून नुपूर आयराला फिटनेसचं प्रशिक्षण देत आहे. त्याचदरम्यान, हे दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून एकेमेकांबरोबरचे अनेक फोटोज नेहमी शेअर करत असतात.
हे देखील वाचा – आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीला एक वर्ष पूर्ण, थाटामाटात साजरा झाला पहिला वाढदिवस, फोटो व्हायरल
येत्या ३ जानेवारी २०२४ रोजी हे जोडपं कोर्ट मॅरेज करणार असून कोर्ट मॅरेजनंतर उदयपूरला ते डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाणार आहेत. तसेच, आमिरने लेक आयरासाठी १३ जानेवारीला मुंबईत एक खास वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केलं. ज्यामध्ये अवघं बॉलिवूड उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.