दाक्षिणात्य चित्रटसृष्टीमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. सुप्रसिद्ध अभिनेता वरुण तेज पाठोपाठ अभिनेत्री अमाल पॉलनेही तिचं लग्न उरकून घेतलं. अमालने अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. पण वरुणच्या लग्नाचा थाटमाट अगदी पाहण्यासारखा होता. वरुणने अभिनेत्री लावण्या त्रिपाठीशी लग्नगाठ बांधत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. इटलीमधील टस्कनी येथे १ नोव्हेंबरला दोघांचा विवाहसोहळा पार पडला. वरुण-लावण्याच्या रिसेप्शन सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. (South Actor Varun Tej Wedding)
लग्नानंतर भारतात परतल्यानंतर वरुण-लावण्या यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळादेखील तितक्याच दिमाखात पार पडला आहे. ५ नोव्हेंबर रोजी हैद्राबादमधील एन कनेक्शन सेंटर येथे वरूण-लावण्या यांचा हा शाही रिसेप्शन सोहळा संपन्न झाला. त्यांच्या या रिसेप्शन सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये वरूण व लावण्या दिमाखात एंट्री करताना दिसत आहेत.
दोघांच्या रिसेप्शन लूकबद्दल बोलायचे झाले तर वरुणने काळ्या रंगाचा सोनेरी डिझाईन असलेला ब्लेजर घातला असून त्यावर साजेशी काळी पँट घातली आहे. या लूकमध्ये तो खूपच सुंदर आणि देखणा दिसत आहे. त्याचबरोबर लावण्याने सोनेरी रंगाची भरजरी साडी परिधान केली असून या रिसेप्शन लूकमध्ये लावण्यादेखील अतिशय सुंदर दिसत आहे.
आणखी वाचा – तीन वर्षातच पहिल्या नवऱ्यापासून विभक्त अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसह उरकलं दुसरं लग्न, फोटो समोर
५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या वरूण-लावण्या यांच्या रिसेप्शन सोहळ्याला कलाविश्वातील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी, नागा चैतन्य, पवन कल्याण, साई धरम तेज, अल्लू अर्जुन, स्नेहा रेड्डी, नितीन समेत यांसह सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांसारख्या अनेक दिग्गजांनी वरुण-लावण्या यांच्या रिसेप्शन सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.
आणखी वाचा – Video : ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओबाबत अखेर रश्मिका मंदानाने सोडलं मौन, म्हणाली, “धक्कादायक गोष्ट…”
२०१७ मध्ये ‘मिस्टर’ चित्रपटाच्या निमित्ताने वरूण-लावण्या यांची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. २०१६ पासून ते एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांनी कधीही त्यावर उघडपणे भाष्य केले नव्हते. दरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा चर्चेत आल्या होत्या. ८ जून २०२३ मध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकले आहेत.