दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हसन हे आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध चित्रपटांमधून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले आहेत. अशातच अभिनेत्याने त्यांच्या वाढदिवशी आज त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट दिली. कमल यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून त्याचा फर्स्ट लुक टीझर देखील समोर आला. ‘ठग लाईफ’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. ज्याचं दिग्दर्शन मणिरत्नम करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हे दोन दिग्गज तब्बल ३६ वर्षांनी एकत्र काम करणार आहे. (Kamal Haasan Thug Life poster out)
याआधी मणिरत्नम यांनी अभिनेत्याच्या १९८७ मध्ये आलेल्या ‘नायकन’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर ते ३६ वर्षांनी एकत्र येत आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिलं पोस्टर व टीझर समोर आला आहे. कमल हसन यांचा हा २३४वा चित्रपट आहे. ज्यामध्ये ते एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या पोस्टरमध्ये कमल यांनी त्यांचा संपूर्ण चेहरा झाकलेला असून त्यांचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतो.
हे देखील वाचा – आमिर खानच्या लेकीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, पाहा फोटो
त्याचबरोबर याचा पहिला टीझरदेखील समोर आला. ज्यामध्ये ते जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ते आपल्या पात्राची ओळख करताना दिसत असून त्यांच्यासमोर काही जण एका मैदानात फाईट करताना दिसत आहे. हातावर पट्टी, लांब केस आणि त्यांची भेधडक नजर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता लागलेली आहे. कमल हसनच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत असून ए आर रहमान यांचं संगीत चित्रपटाला लाभलं आहे. यात कमल यांच्यासह जयम रवी, त्रिशा, दलकीर सलमान आदी कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध अभिनेता वरुण तेजच्या लग्नाचा इटलीत शाही थाट, तर भारतातील रिसेप्शन सोहळ्याने वेधलं लक्ष, पाहा फोटो
कमल हसन आपल्याला याआधी ‘विक्रम’ चित्रपटात दिसले. ज्याचं दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच त्यांचा लवकरच ‘इंडियन २’ चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. कमल हसन यांचा ॲक्शनपॅक चित्रपट हिंदीसहित अन्य भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.