Nupur Shikhare and Ira Khan Marriage : अभिनेता आमिर खानच्या लेकीचा म्हणजेच आयरा खानच्या लेकीचा ३ जानेवारी रोजी शाही विवाहसोहळा संपन्न झाला. आयराने नुपूर शिखरेसह सप्तपदी घेत लगीनगाठ बांधली. आमिरच्या लेकीच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आमिर खानची लेक आयरा खान सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आयरा खान व नुपूर शिखरेच्या शाही लग्नसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आयरा व नुपूर यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रमही अतिशय उत्साहात साजरे होताना दिसले. नूपुरच्या हळदी समारंभासाठी आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी किरण राव व रीना दत्ता यांची उपस्थिती होती. आमिर खानच्या लेकीच्या लग्नासाठीही त्यांच्या दोन्ही पत्नींनी विशेष सहभाग घेत एन्जॉय केलेलं पाहायला मिळत आहे. आयरा व नूपुरच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. दोघांच्या रिसेप्शन लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आयरा व नूपुरच्या लग्नाला मराठी कलाकारांची मांदियाळी ही पाहायला मिळाली. नुपूर व आयराचा मित्रपरिवार म्हणजेच मिथिला पालकर, सिद्धार्थ मेनन, सारंग साठ्ये व त्याची पत्नी पॉला मॅकग्लेन यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. दोघांच्या लग्नाला या कलाकार मंडळींनी धमाल मस्ती केलेली पाहायला मिळत आहे. लग्नाआधीही मिथिला पालकर व इतर मित्रपरिवाराने आयरा व नुपूर यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने केळवण साजरं केलं.
आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीची कमाई किती?, वर्षभरात कमावते इतके कोटी, स्वत:ची प्रॉपर्टी आहे अन्…
गेले दोन दिवस आयरा व नुपूर यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी मराठमोळ्या व महाराष्ट्रीयन पद्धतीने या विधी पार पडल्या. अशातच काल (3 जानेवारी) रोजी दोघांचे नोंदणी पद्धतीने लग्न पार पडले आहे. त्यांच्या आयरा खानने लग्नात धोती चोली ड्रेस परिधान केला होता. तर नुपूर मात्र त्याच्या लग्नात बनियान व शॉट्सवर असल्याचे पाहायला मिळाले. लग्नात आयरा-नुपूर यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे हे दोघेदेखील चांगलेच चर्चेत आले आहेत.