सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संजनाला अरुंधतीकडून सक्त ताकीद, मनूच्या एन्ट्रीने प्रेक्षकांची नाराजी, प्रोमो पाहून म्हणाले, “हिच्यामुळे आशुतोष गेला आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 15, 2024 | 2:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay karte troll

संजनाला अरुंधतीकडून सक्त ताकीद, मनूच्या एन्ट्रीने प्रेक्षकांची नाराजी, प्रोमो पाहून म्हणाले, "हिच्यामुळे आशुतोष गेला आणि..."

गेली सव्वा चार वर्षे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. एका मागोमाग एक येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बरेचदा मालिकेतील कथानकामुळे ही मालिका ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेली पाहायला मिळाली. अरुंधतीचा मालिकेतील खडतर प्रवास पाहणं प्रेक्षकांना विशेष भावतंय. अशातच सध्या मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूने अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढवलं आहे. (Aai Kuthe Kay karte troll)

अरुंधती सध्या केळकरांच्या घरी राहत नसून ती देशमुखांच्या घरी राहायला आली आहे. आणि हे काही संजनाला हे काही पटलेलं नाही. त्यामुळे संजना काही ना काही कारण काढून अरुंधतीला सुनावताना दिसत आहे. अशातच मालिकेच्या एका समोर आलेल्या प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत आशुतोष आणि अरुंधतीची मुलगी मनु ही पुन्हा परतली असल्याचे पाहायला मिळत आहे. मनु अरुंधतीला सांगताना दिसत आहे की, ‘मी आहे तू काहीच काळजी करु नको’. तितक्यात तिथे संजना येते.

आणखी वाचा – एका घरात राहूनही कित्येक दिवस एकमेकांना भेटत नाहीत प्रथमेश परब व त्याची बायको, क्षितीजाचाच खुलासा, म्हणाली, “वेळ काढून…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संजना मनूला सांगते की, ‘मनु तुला माहिती आहे का?, तुझ्या आईमुळे तुझ्या बाबांचा अपघात झाला’. हे ऐकून मनूला खूप राग येतो आणि म्हणून ‘हो आई आय हेट यू’, असं म्हणून तिथून निघून जाते. त्यानंतर अरुंधती संजनाला चांगलंच सुनावते. अरुंधती संजनाला म्हणते की, “माझ्या नात्यांच्या मध्ये यायचा प्रयत्न करू नकोस, आणि हे मी तुला शेवटचं सांगतेय”, असं तिला खडसावते. अरुंधतीने आता संजनाला सक्त ताकीद दिलेली असते. दरम्यान समोर आलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत मालिकेला ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : खास सरप्राइज देत मायरा वायकुळला घरच्यांनी दिली आईच्या गरोदरपणाची बातमी, मोठी बहीण होणार कळताच तिने काय केलं पाहा, व्हिडीओ व्हायरल

नेटकऱ्यांना मनु पुन्हा मालिकेत आलेली आवडलेली नाही. तर काहींनी संजनाला बोलण्याची शिस्त नाही असं म्हणत तिलाही ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी मालिका बंद करा असंही म्हटलं आहे. “खरंतर मनू परत यायलाच नको. अशा दत्तक मुलीमुळे तर सर्व अरुंधतीच्या आयुष्याची वाट लागली”, “खरंतर आशु या मनूमुळे गेला. आणि या संजनाच्या दोन थोबाडीत मारा”, “ही संजना, अनिरुद्ध आणि त्याची बिनडोक मुलगी ईशा कधीही सुधारणार नाहीत. स्वार्थी लोक आहेत”, “मनूमुळे आशुतोष गेला आता कशाला आली आहे”, असं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Tags: aai kuthe kay karteaai kuthe kay karte trollmarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Surekha Talwalkar shared a special post for her daughter receiving the 'Student of the Year' award for two years.

'या' क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सुलेखा तळवलकर यांची लेक, शिक्षणात यश मिळताच आईचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, "सलग दोन वर्ष..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.