सिनेसृष्टीत बरेच कलाकार मंडळींच्या विवाह सोहळ्याची चर्चा रंगलेली पहायला मिळाली. अशातच प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबच्या शाही विवाह सोहळ्याचीही विशेष चर्चा रंगली. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. प्रथमेशच्या लग्नापूर्वीच्या विधींची बऱ्याच दिवसांपासून धामधूम सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर प्रथमेश त्याची गर्लफ्रेंड क्षितिजासह सात फेरे घेत लग्न बंधनात अडकला आहे. (Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar)
लग्नानंतर प्रथमेश व क्षितिजा संसारात रमलेले दिसले. सोशल मीडियावर प्रथमेश व क्षितिजा बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बऱ्याच वर्षांपासून प्रथमेश व क्षितिजा एकमेकांना डेट करत होते. यंदाच्या वेलेंटाईन डेला दोघांच्या नात्याला तीन वर्षे पूर्ण होताचं त्यांनी साखरपुडा सोहळा उरकला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले. कोणताही अवाढव्य खर्च न करता दोघांनी अत्यंत साधेपणानं त्यांचा साखरपुडा समारंभ उरकला.
काल प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण झाले. अशातच प्रथमेशची बायको क्षितिजाने तिच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण होताच एक खास स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “डेट अँड डिनर. साखरपुडानंतरचा दुसरा महिना. १४ एप्रिल. एका घरात राहून सुद्धा जेव्हा शूट, नाईट शिफ्ट व ऑफिस यामुळे कित्येक दिवस एकमेकांना भेटता येत नाही आणि तरीही वेळ काढून तुमचे स्पेशल डे तुम्ही आवर्जून साजरे करता”, असं म्हणत तिने ही खास पोस्ट शेअर केली आहे.
क्षितिजाच्या या पोस्टवरुन त्यांच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण होताचं या खास दिवसाला दोघांनी डिनर डेटचा प्लॅन केलेला पाहायला मिळाला. क्षितिजाने प्रथमेशबरोबरचा सेल्फी शेअर केलेला पाहायला मिळत आहे. लग्नानंतर प्रथमेश व क्षितिजा दोघांनीही कामाला सुरवात केली आहे. कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून ते वेळात वेळ काढत एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत.