छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या मायराने अल्पावधीतच आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालितकेमुळे ती मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा बनली. अशातच आता ती लवकरच मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. आगामी नाच गं घुमा या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मायरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मायराची आई श्वेता वायकुळ ही तिचे सोशल मीडिया बघते. अशातच नुकतीच गुढीपाडव्याच्या दिवशी मायरा ताई होणार असल्याची खुशखबर शेअर करण्यात आली. मायराच्या आई-वडिलांनी खास फोटो शूटद्वारे ही गुडन्यूज सांगितली होती. यामधील एका फोटोमध्ये मायरा ‘मी मोठी ताई होणार’ असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या फोटोवर मायराच्या चाहत्यांनी मायराचे व तिच्या आई-वडिलांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
अशातच आता मायरा ताई होणार असल्याची गुडन्यूज ऐकताच मायराची काय प्रतिक्रिया होती, यचा व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला आहे. याची एक छोटीशी झलक मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आली आहे, तर याचा संपूर्ण व्हिडीओ मायराच्या युट्यूब वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या व्हिडीओमध्ये तिचे आईवडील तिला या खुशखबरचे सरप्राईज देण्याचे ठरवतात आणि मग ते ती काहीही कल्पना नसताना घरात येते आणि सजवलेलं घर पाहून तिला आश्चर्य वाटते.
यानंतर तिला ती ताई होणार असल्याचे कळताच तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. तिला ती मोठी ताई होणार असल्याचे कळताच ती खूप खुश होते. यानंतर तिला तिचे आई-वडील तुला कोण हवं आहे? असा प्रश्न विचारतात, यावर ती मला मुलगी हवी असल्याचे म्हणते. तिच्या या उत्तराचे सर्वानाच कौतुक वाटते. यादरम्यान ती तिच्याअ आईला घट्ट मिठी मारतानाचेही दृश्य पाहायला मिळत आहे.
दरम्यान, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या आगामी चित्रपटात मायरासह अनेक कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते आदी मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत.