वडील व मुलीचं नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा कायमच निराळं असतं. बरेच कलाकार मंडळी असे आहेत जे त्यांच्या वडिलांच्या अनेक आठवणी कायमच शेअर करत असतात. तसेच कित्येकदा ते वडिलांच्या आठवणीत भावुक झालेले ही पाहायला मिळाले आहेत. अशातच वडिलांच्या आठवणीत भावुक झालेल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. (Ashvini Mahangade Emotional)
‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अश्विनीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या शिवाय ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक करण्यात आलं. या मराठमोळ्या अश्विनीने भावुक होत एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यांत तिने वडिलांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसह कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “माझ्या हजारो गप्पा, तुम्ही केलेलं कौतुक, माझ्या हजारो चुका आणि तरीही तुमची साथ, सगळेच संपले…” ‘बापमाणूस’ असं लिहीत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. शिवाय आणखी एक वडिलांबरोबरचा फोटो पोस्ट करत तिने ‘नाना तुमची आठवण येतेय’ असं म्हटलं आहे.
करोनादरम्यान म्हणजेच दोन वर्षांपूर्वी अश्विनीच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर वडिलांच्या आठवणीत भावुक होतं तिने बरेचदा पोस्ट शेअर केल्या होत्या. अशातच अश्विनी पुन्हा एकदा वडिलांच्या आठवणीत भावुक झाली आहे. अश्विनी आणि तिचे वडील नाना यांचं बॉण्डिंग खूप घट्ट होतं. मागील काही दिवसांपूर्वी ‘अजब गजब’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने कठीण काळाबद्दल भाष्य केलं आणि अखेर नैराश्यात ती थेट आत्महत्या करायला गेली होती त्यावेळी वडिलांच्या शब्दांनी तिला हे कृत्य करण्यापासून थांबवलं” याबद्दलही सांगितलं.
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अश्विनी आजही तिच्या आई वडिलांची शिकवण विसरलेली नाही. तिच्या नानांनी दिलेली शिकवण व संस्कार कायमच अश्विनला दृढ बनवत गेले. आज अश्विनी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती एक उत्तम समाजसेविका आहे. समाजासाठी नेहमीच ती काही ना काही करत असते. शिवाय शिवप्रेमी असलेली अश्विनी गड, किल्ल्यांच्या संरक्षणाचे धडे ही वेळोवेळी देत असते.