मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांच्या यादीत एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जाईल. ते नाव म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली सव्वाचार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेच्या कथानकाने मालिकेच्या प्रेक्षकवर्गाला आजही खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. मालिकेतील कलाकारांचे अनेक चाहते आहेत. मालिकेत मध्यंतरी आलेल्या रंजक वळणाने ही मालिका विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. (Onkar Gowardhan New Entry)
मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूने मालिकेला एक रंजक वळण आलेलं पाहायला मिळालं. आशुतोषच्या अपघाती मृत्यूनंतर अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढावलेलं पाहायला मिळालं. तर आशुतोषच्या आईने म्हणजेच सुलेखा ताईंनीही आशुच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरले. आशुतोष म्हणजेच ओंकार गोवर्धनच्या मालिकेतील एक्झिटनंतर मालिकेतील कलाकारांनीही त्याला मिस करत असल्याच्या पोस्ट शेअर केल्या. इतकंच नव्हे तर कलाकारांनी आशुला मालिकेत पुन्हा आणा अशी विनंती केली. ओंकारची मालिकेतील एक्झिट चाहत्यांना आवडली नाही.
ओंकारने या मालिकेमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेमुळे ओंकारला भरपूर प्रेम व प्रसिद्धी मिळाली. आता ओंकारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ओंकार त्याच्या आगामी प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. मालिका व सिनेमामधून नाहीतर ओंकार रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. एका विनोदी अंगाच्या नाटकातून तो नाटकविश्वाकडे वळला आहे. भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकातून तो रंगमंचावर येणार आहे. हे नाटक नव्या कलाकारांच्या संचात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये ओंकार गोवर्धन महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळेल.
‘वस्त्रहरण’ या नाटकात ओंकार नेमका कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मालिकेनंतर ओंकारची विनोदी नाटकातील एन्ट्री पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक आहेत.