हिरवागार निसर्ग, खळखळ वाहणाऱ्या नद्या व खाद्य संस्कृती अशी कोकणची ओळख आणि त्याचं सर्वांनाच आकर्षण. त्यामुळे इथली संस्कृती व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक कलाकार त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत कोकणात पोहोचतात. अशातच अभिनेता संतोष जुवेकरनंतर आता मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेता कोकणातील गावी पोहोचला आहे. (Niranjan Deshmukh in Kokan)
छोट्या पडद्याद्वारे घराघरांत पोहोचलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी हा ‘आई कुठे काय करते’ मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुकाचा वर्षाव होतो. अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्याचे अनेक फोटोज व व्हिडिओज त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो. निरंजन नुकताच कोकणात पोहोचला असून त्याचा कोकणातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाठिंबा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
निरंजनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसह शेअर केला. ज्यामध्ये तो कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसतो. शेअर केलेल्या या व्हिडिओत अभिनेता त्याच्या कोकणातील गावी एका विहिरीतून पारंपरिक पद्धतीने पाणी काढत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये नारळ व सुपारीची बागदेखील पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना निरंजनने “विहिरीच्या पाण्याची चव निराळी” असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांसह कलाकार कमेंट्सद्वारे त्याचं कौतुक करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – Video: पाचवीत असताना अशी दिसायची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळे, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
निरंजन सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिषेकची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याने अनेक नाटकांमध्ये काम केलं असून गेल्यावर्षी ‘सोल कढी’ या लघुपटातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं होतं.