बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांच्याबरोबर सध्या बोलणं नाही पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील मित्रांनी शो पाहिला का? विचारताच ओंकार भोजनेचं उत्तर, म्हणाला, “जेव्हा ते बघतील…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 2, 2024 | 3:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Onkar Bhojane talked about what was the reaction of Maharashtrachi Hasyajatra’s artist reaction on Hastay Na Hasayalach Pahije show

"त्यांच्याबरोबर सध्या बोलणं नाही पण...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील मित्रांनी शो पाहिला का? विचारताच ओंकार भोजनेचं उत्तर, म्हणाला, "जेव्हा ते बघतील..."

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, या रिऍलिटी शो मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे अभिनेता ओंकार भोजने. विनोदाचं अचूक टायमिंग जुळवत ओंकार भोजनेने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील त्याची गौरव मोरे, वनिता खरात, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब यांसह सर्वच कलाकारांबरोबरचे प्रहसन चांगले गाजले.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाकडे केवळ एक कार्यक्रम म्हणून नव्हे, तर कुटुंब म्हणून पहिलं गेलं असल्याची प्रतिक्रिया कायमच कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र अभिनेता ओंकार भोजनेने या शोमधून काही दिवसांपूर्वी ब्रेक घेतला. त्यामुळे हास्यजत्रेच्या या कुटुंबातून ओंकार भोजने या एका सदस्याची एक्झिट झाल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांची नाराजी व्यक्त केली होती.

आणखी वाचा – “मला त्यामध्ये काहीच रस नाही”, इतर विनोदी कार्यक्रमांबरोबर होणाऱ्या तुलनेवर बोलला ओंकार भोजने, म्हणाला, “माझा प्रवास हा…”

ओंकारने नुकतीच हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकारांबरोबर संपर्कात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ओंकारने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी त्याला ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोवर हास्यजत्रेमधील कलाकारांची काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “सध्या त्यांचेही शोज आणि शूटिंग सुरु आहे. त्यामुळे जे जे आपापल्या कामात जास्तच व्यस्त आहेत त्यांच्याबरोबर आता बोलणं नाही झालं. पण आता या शोचे एपिसोड जसे जसे येतील. तेव्हा ते बघतील आणि त्यानंतर ते नक्कीच मला त्यांच्या प्रतिक्रिया सांगतील”.

आणखी वाचा – Video : परळ-लालबागच्या बाजारात जांभूळ खरेदी करताना दिसला सुरेश रैना, मार्केटमध्ये सगळ्यांना दिलेली वागणूक पाहून होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्याने असं म्हटलं की, “एपिसोड्स पाहिल्यानंतर हे सगळेच असं कर, तसं कर म्हणून सांगतील. तर त्यांनी हे बदल सुचवणे हे एक टीम व कुटुंब म्हणून कायमच राहील. जर प्रेक्षक खूप लांबूनही मला प्रतिक्रिया देत असतील तर यांच्याबरोबर मी एकत्रच राहिलो आहे आणि खूप वेळ एकत्र घालवला आहे. त्यामुळे ते जे जे काय सांगणार ते ते मी नक्कीच ऐकणार.”  दरम्यान, ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून एक्झिट घेतल्यानंतर ओंकारने अनेक विनोदी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन केले आणि अशातच तो आता ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे.

Tags: marathi actormarathi entertainment newsonkar bhojane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Kanyadan fame actor Chetan Gurav just marriage video viral on social media

‘कन्यादान’ फेम सुप्रसिद्ध अभिनेताचा विवाहसोहळा संपन्न, हळदीत नवरदेवासह वनिता खरातचाही राडा, फोटो व व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.