मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. यामध्ये दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या शौर्यावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा नवा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. (Eknath Shinde wishes ‘Shivrayancha Chhava’ film)
दिग्पाल यांनी ‘श्री शिवराज अष्टक’मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ या पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यातील ‘सुभेदार’ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ते लवकरच ‘शिवरायांचा छावा’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. जो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटाचे पोस्टर व्हिडीओ पाहून दिग्पाल यांचं कौतुक केलं आहे. शिवाय, त्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – गौतमी पाटीलला कोकणात प्रवेश नाही, कार्यक्रमाला विरोध, पण यामागचं नेमकं कारण काय?
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर चित्रपटाचा पोस्टर शेअर व्हिडीओ केला. हा व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले, “धर्मसंरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट “शिवरायांचा छावा” येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, निर्माते मल्हार पिक्चर्स आणि वैभव भोर, किशोर पाटकर तसेच संपूर्ण टीमला शुभेच्छा.”
हे देखील वाचा – “आम्हीच नंबर वन”, टीआरपीच्या खोट्या बातम्यांवर जुई गडकरीचा संताप, ‘प्रेमाची गोष्ट’बाबत विचारताच म्हणाली, “चुकीच्या गोष्टी…”
धर्मसंरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट #शिवरायांचा_छावा येत्या १६ फेब्रूवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, निर्माते मल्हार पिचर्स आणि वैभव भोर, किशोर पाटकर तसेच संपूर्ण टीमला शुभेच्छा. pic.twitter.com/YRs6diYQng
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 3, 2023
दरम्यान, चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार? याबद्दलची माहिती समोर आली नाही. पण चाहत्यांना चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, तृप्ती तोरडमल, अभिजीत श्वेतचंद्र, विक्रम गायकवाड आदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. वैभव बोरकर आणि किशोर पाटकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून १६ फेब्रुवारी २०२४ रोजी हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.